छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या प्रॉपर्टीवर देखील आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसर खान आक्षेप घेतला आहे. पाच वर्षे आमदार आणि पाच वर्ष खासदार राहिलेल्या इम्तियाज जलील यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. पत्नीच्या नावे जलील यांनी खुलताबादमध्ये एक कोटीची प्रॉपर्टी घेतली आहे. शिवाय पूर्वी राहत असलेले मन्नत क्रमांक एक हे घर कोट्यावधीचे असताना केवळ 95 लाखात खरेदी केलं आहे. सोबतच आता राहत असलेला मन्नत टू बंगल्यावर देखील कोट्यावधी रुपयाचा खर्च केला असल्याचं आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते आफसर खान यांनी केला आहे. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रॉपर्टीवर आक्षेप नोंदवणारे इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीच्या आरोपावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
इम्तियाज जलील अनेकांना ब्लॅकमेल करतात...
वंचित बहुजन आघाडी नेते अफसर खान इम्तियाज जलील यांच्या प्रॉपर्टीवर बोलताना म्हणाले, इम्तियाज जलील अनेकांना ब्लॅकमेल करतात. लोकांना घाबरवतात आणि ब्लॅकमेल करतात. 1 लाख रूपये पगार इम्तियाज जलील यांना मिळते. 2 कोटींचे घर जलील यांनी 95 लाख रुपयात घेतलं असल्याचे दाखवतात. घरावर 2 कोटी खर्च केले. सिडको प्रशासनावर दबाव टाकून हे घर घेतले होते. तीन वर्षात जलील यांच्याकडे 3 कोटी रुपये कुठून आले. 1 लाख पगार असणाऱ्या जलील यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून आले. घराला फक्त 4 हजार टॅक्स लागतो, पण त्यांना त्यापेक्षा जास्त टॅक्स लागला पाहिजे असंही अफसर खान यांनी म्हटलं आहे.
सिडकोचा नियम आहे, एक व्यक्तीला एकच पोपर्टी मिळते. पण इम्तियाज जलील यांच्याकडून नियम भंग करण्यात आले आहे. जलील यांच्या नावावर त्यांचं मन्नत घर नाही. लीज संपलेली एक जागा ते वापरत आहे. त्यावर कार्यालय थाटले आहे. जलील यांच्या पत्नीच्या नावावर एक अर्धा एकर जागा खुलताबाद येथे घेतली आहे. ज्याचा भाव 1 कोटी आहे. गुटखा धंदा शहरात सुरू आहे, पण अधिकार नसताना एका ठिकाणी छापा मारला होता. बायो डिझेलमध्ये सहभाग आहे. लोकांवर दबाव टाकून मालमत्ता जमा केली आहे. जलील यांनी केलेल्या विकास कामाची चौकशी करण्याची मागणी माजी जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. जलील यांच्या दोन्ही मन्नत घराला महानगरपालिका आणि सिडको यांची परवानगी नाही. दोन्ही घर अवैध आहेत, असंही अफसर खान यांनी म्हटलं आहे.