सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
in Satara tourist spots banned till August 19: महाबळेश्वर आणि पाचगणीतील पर्यटनस्थळांसह धरणांवर पावसाळ्यात मोठी गर्दी होते.
in Satara tourist spots banned till August 19
1/9
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु आहे.
2/9
सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
3/9
यावर्षी जून महिन्यात प्रथमच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
4/9
दरम्यान, पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटनस्थळावर 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.
5/9
सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.
6/9
आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
7/9
यामध्ये विविध धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे आणि धरणांचा समावेश आहे.
8/9
सातारमधील अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली पर्यटन ठिकाणे आहेत.
9/9
तसेच पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, उरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा सुद्धा प्रसिद्ध आहे.
Published at : 20 Jun 2025 02:32 PM (IST)