Eng vs Ind 1st Test Day-1 Update : लीड्सवर पहिल्याच दिवशी भारताची बाजी! शतकवीर गिल-यशस्वी अन् पंतचा जलवा; इंग्लंडच्या माऱ्याला भारताचं तडाखेदार उत्तर

Eng vs Ind 1st Test Day-1 Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.

किरण महानवर Last Updated: 20 Jun 2025 11:12 PM

पार्श्वभूमी

England vs India 1st Test 1st Day Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. युवा...More

पहिल्या दिवशी भारताचा दबदबा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. पहिल्या डावात खेळ थांबेपर्यंत भारताने तीन बाद 359 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार शुभमन गिलने 175 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकारासह 127 धावा केल्या आणि उपकर्णधार ऋषभ पंतने 102 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 65 धावा केल्या. भारतासाठी हा दिवस खूप चांगला होता आणि यशस्वी जैस्वाल आणि गिलने शतके झळकावली, तर पंत अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला.