RSS Shatabdi Varsh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज ऐतिहासिक पथसंचलन; डॉ. हेडगेवारांच्या केशवीय मार्गाचंच स्वयंसेवकांकडून अनुकरण; वाचा RSSच्या पथसंचलनाचा सविस्तर इतिहास
RSS Shatabdi Varsh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरात आज (27 सप्टेंबर रोजी) ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. हे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन असेल.

RSS Shatabdi Varsh नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नागपुरात आज (27 सप्टेंबर रोजी) ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. हे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) नागपूरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन असेल. 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. या स्थापनेच्या औचित्याने या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पथसंचलनासाठी स्वयंसेवकांचे तीन पथक वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण करतील. पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल. यामध्ये त्रिमूर्तिनगर, धरमपेठ, गिट्टीखदान आणि सोमलवाडा भागातील स्वयंसेवक सहभागी होतील. दुसरे पथक कस्तुरचंद पार्क येथून पथसंचलन सुरू करेल. या पथकाचे संचलन 2.9 किलोमीटरचे असेल. मोहितेश आहाल, लालगंज, बिनाकी आणि सदर भागातील स्वयंसेवक यात सहभागी होतील. तिसरे पथक यशवंत स्टेडियममधून पथसंचलन सुरू करेल. यात इतवारी, अजनी, अयोध्या नगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील. हे पथसंचलन संघाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून पाहिले जात आहे.
RSS शताब्दी वर्षानिमित्त ऐतिहासिक पथसंचलन, ऐतिहासिक महत्व (RSS Centenary Path Sanchalan)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पथसंचलनाचा मोठा इतिहास आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून पथसंचलन नियमितपणे होते. आज नागपुरात होणारे संघाचे पथसंचलन शताब्दी वर्षाचे आहे. हे पथसंचलन डॉ. हेडगेवार यांच्या काळात ज्या मार्गातून होत होते, त्याच मार्गावरून आज होणार आहे. संघाच्या इतिहासाचे जाणकार डॉ. भालचंद्र हरदास यांनी याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, 'एका प्रकारे डॉक्टर हेडगेवार यांचा तेव्हाचा जो केशवीय मार्ग होता, त्याच मार्गाचं अनुकरण आज नागपुरात हजारो स्वयंसेवक करणार आहेत.
RSSच्या पथसंचलनाचे ऐतिहासिक महत्व(Historical significance of RSS Path Sanchalan)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. संघ विचाराचीही ही शताब्दी आहे. आजचे पथसंचलन ऐतिहासिक आहे. पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या काळात, 1933, 1936 आणि 1938 मध्ये दैनिक महाराष्ट्राच्या अहवालांनुसार, तेव्हाही हे संचलन व्हायचे. तेव्हा हा उत्सव दोन दिवस व्हायचा, नवमीला शस्त्रपूजन आणि दशमीला सिमोल्लंघन मिरवणूक टाऊन हॉल येथील लक्ष्मणराव राजे भोसले किंवा चौथे रघुजी महाराज भोसले यांच्या वाड्याच्या प्रांगणातून ही सिमोल्लंघनाची मिरवणूक निघायची. मिरवणुकीचा मार्ग टिळक पुतळा पुतळ्याला अभिवादन करून इंडियन जिमखाना दंतवलीमध्ये कार्यक्रमासाठी यायचा. कार्यक्रम झाल्यावर पथसंचलन महाराज बाग, सीताबर्डी चौक आणि धंतोली मार्गे निघायचे. डॉक्टरांच्या काळात जिथून पथसंचलन निघाले, तिथेच आज 2025ला पुन्हा पथसंचलन निघत आहे. पथसंचलन हे शक्तीचे प्रतीक आहे आणि आपली शक्ती ही आपण समाजाला दाखवली पाहिजे. समाज देखील त्या शक्तीला पाहून आपल्यामध्ये संमीलित झाला पाहिजे हे एक उदाहरण असते. पथसंचलन हे सिमोल्लंघनाचे पण एक लक्षण आहे. संघ आपला इतिहास विसरत नाहीये. असे मत संघाच्या इतिहासाचे जाणकार डॉ. भालचंद्र हरदास यांनी व्यक्त केलं आहे.
असा असेल पथसंचलनाचा मार्ग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज (27 सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता नागपुरात स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे. यशवंत स्टेडियम, कस्तुरचंद पार्क मैदान आणि हॉकी मैदान या तीन ठिकाणांहून निघणारे पथसंचलन सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकात पोहोचेल. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या पथसंचलनाचे अवलोकन करतील. नागपुरात आजवर झालेल्या संघाच्या पथसंचलनांपैकी हे सर्वात मोठे पथसंचलन असणार आहे. या पथसंचलनात 9 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























