Nana Patole on Nanar Refinery : कोकण रिफायनरीमुळे निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी पोहोचत असेल, तर काँग्रेस त्याचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यामुळे आता कोकणातील रिफायनरीला काँग्रेसचा देखील विरोध आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.  नाना पटोले आज रिफायनरी विरोधकांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी रिफायनरी विरोधी महिलांकडून जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वी नाना पटोले यांनी घेतली रिफायनरी समर्थकांची भेट घेतली होती. यावेळी रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या विधान परिषदेचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.  


दरम्यान, रिफायनरी विरोधकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची मागणी केली. यावेळी विनाशकरी प्रकल्प जाणार नाही तोपर्यंत आम्ही कुणाचे नसल्याचे भूमिका रिफायनरी विरोधकांनी नाना पटोले यांच्यासमोर बोलताना घेतली. संतापलेल्या रिफायनरी विरोधकांना शांत करताना नाना पटोले म्हणाले की, रिफायनरीबाबत नेमकी वस्तूस्तिथी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. 


चायनाची चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या टी शर्टवर बोलू नये


भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टवरून भाजपने टीका केली होती. यावरून नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला आहे. चायनाची चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या टी शर्टवर बोलू नये, देशात महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न असल्याचे ते म्हणाले. 


तर विश्वास कसा ठेवायचा? नाना पटोले यांचा सवाल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांची भेट घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सरन्यायाधीश आरोपीला भेटत असतील, तर विश्वास कसा ठेवायचा? अशी विचारणाही त्यांनी केली. राज्यात असंविधानिक सरकार असल्याचे ते म्हणाले. 


महाराष्ट्रचा तमाशा निर्माण करण्याचा काम सुरु 


गुवाहाटीनंतर महाराष्ट्र बदनाम झाला आहे. केंद्रात बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रला बदनाम केले. राज्यातील गोंधळ लोकशाहीला घातक, भाजप लोकशाहीला विरोधी धोरण राबवत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केला.  


इतर महत्वाच्या बातम्या