रत्नागिरी: दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्टची मालकी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलं असल्याचा दावा करत इडीने त्यावर जप्तीची कारवाई केली होती.
या आधी मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून साई रिसॉर्टवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्यात आली होती. सीरआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
ईडीने जवळपास 10.20 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यामध्ये 2 कोटी 73 लाख 91 हजार रुपये किमतीची जवळपास 42 गुंठे जमीन आणि 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये किमतीचे रिसॉर्ट याचा समावेश होता.
साई रिसॉर्टचे बांधकाम हे CRZ कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मागील जवळपास दीड-दोन वर्षांपासून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचं हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण आहे. तर, सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे तरी काय?
साई रिसॉर्ट प्रकरणाी जयराम देशपांडे व सदानंद कदम यांना ईडीनं अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे या प्रकरणात तपास अद्यापही सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे. या आरोपपत्रात सध्या 6 आरोपींविरोधात आरोप आहे. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. मात्र या प्रकरणाचे सूत्रधार अनिल परब असल्याचे ईडीने म्हटले आहे.
ही बातमी वाचा: