मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपला दावा सांगितला आहे. खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचं आता वय झालं आहे, जर ते निवडणुकीला उभे राहणार नसतील तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ( Mumbai North West Lok Sabha Election) उमेदवार हे सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) असतील असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलंय. त्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम यांची चर्चा झाली असेल अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर आता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल याची चर्चा मात्र सुरू झाली.
खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदेंच्या शिवसेनेत असून त्याचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray) आहेत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात सिद्धेश कदम यांचे फ्लेक्सही झळकताना दिसत आहेत.
काय म्हणाले रामदास कदम?
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) हेच पुन्हा उभे राहतील, कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल असे सांगत खासदार गजाभाऊ कीर्तीकर यांचे आता वय झाले आहे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कदाचित गजाभाऊ कीर्तिकर उभे राहिले नाहीत तर या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील असं मोठे वक्तव्य शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली दौऱ्यावर असताना केल आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानान कीर्तीकर हे खासदार आहेत. गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. गजानन कीर्तीकर यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत आणि 2019 मध्ये संजय निरुपम यांचा यांचा पराभव केला होता.
गजानन कीर्तीकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. त्यांनी बाळासाहेबांच्य खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. मुंबईतील शिवसेनेच्या वाढीसाठी कीर्तीकरांनी झोकून देऊन काम केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कीर्तीकर कुणाला साथ देणार याची उत्सुकता होती. त्यांनी मागील दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहापैकी तीन भाजप आणि तीन ठाकरे गट असे आमदार या मतदारसंघात आहेत. मात्र खासदार असलेले गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत.
ही बातमी वाचा: