एक्स्प्लोर

Nagpur : 13 तालुक्यात फिरणार आपत्ती व्यवस्थापनाचा चित्ररथ, पावसाळ्यात वीजेपासून होणाऱ्या हानी बाबत करणार जनजागृती

पावसाळ्यात वीजेपासून होणारी मनुष्य व वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चित्ररथ तयार केला आहे. याद्वारे 13 तालुक्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नागपूर :  जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. यावेळी नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ काळजी घ्यावी. वीजेचा कडकडाट असताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन, जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले तसेच जनजागृतीसाठी तयार केलेल्या चित्ररथला हिरवी झेंडी दाखवली. हा चित्ररथ जिल्ह्यातील 13 तालुक्यात फिरणार असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत नागरिकांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात वीजेपासून होणारी मनुष्य व वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चित्ररथ तयार केला आहे. त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रीकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व  वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. अतिवृष्टीच्या वेळी नदीस पूर आला असल्यास, नदी दुथडी भरून वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पद्धतीने पुल पार करण्याचा प्रयत्न करू नये, या कालावधीत भारतीय हवामान खाते तसेच धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांनी संबंधित विभागाकडून दिल्या जात असलेल्या सूचना, हवामानाचा अंदाज, चेतावणी, पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग, याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे, शासकीय सूचनांचे पालन करणे आदी बाबत चित्ररथाद्वारे माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहचविण्यात येणार आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती असणारे जिल्हा माहिती कार्यालयाने साहित्यही चित्ररथामार्फत गावागावांमध्ये पोहोचविण्याचे ठरवले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur : सामाजिक न्याय विभाग; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रीया सुरु

RTMNU : अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग; विद्यार्थ्यांची होणारी 'अतिरिक्त शुल्क लूट' थांबणार

महत्त्वाच्या बातम्या

Pitru Paksha 2026: मुलगा नसेल, तर मुलगी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकते का? गरुडपुराण, धार्मिक मान्यता सांगते...
मुलगा नसेल, तर मुलगी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकते का? गरुडपुराण, धार्मिक मान्यता सांगते...
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

व्हिडीओ

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Embed widget