Ramdas Kadam on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काँग्रेसच्या (Congress) मांडीवर जाऊन बसले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) नाव बलात्काराच्या गुन्ह्यात पुढे आले तेव्हा तुम्ही पंतप्रधानांना मागच्या दाराने गुपुचूप भेटायचे आणि आता त्यांनाच शिव्या देत आहात, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे. 


रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या प्रचारार्थ दापोली विधानसभा मतदारसंघातील केळशी, आसोंड, तेरेवायंगणी, पाजपंढरी येथे जाहीर सभा पार पडल्या. या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला.


उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत 


रामदास कदम म्हणाले की,  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल, तेव्हा माझे दुकान बंद करून टाकेल असे सांगितले होते. मात्र नालायक उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घालताय, लाज वाटत नाही. स्वतःच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद उद्धव ठाकरे आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. 


पंतप्रधानांवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का ? 


ते पुढे म्हणाले की, मातोश्री आमचे दैवत होते. विजयी उमेदवाराची माँसाहेब आरती करायचे. आता काय चाललंय त्या मातोश्रीमध्ये? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? कुणावरती बोलताय सूर्याकडे बघून थुंकल्यावर थुकी तोंडावर पडते हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावे. संजय राऊतांवर तर न बोललेलंच बरं, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे. 


तेव्हा पंतप्रधानांना मागच्या दाराने गुपुचूप भेटायचे 


स्वतःच्या मुलावर आदित्य ठाकरेंवर जेव्हा प्रसंग आला. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याचे नाव पुढे आले. तेव्हा मात्र याच पंतप्रधानांना मागच्या दाराने गपचूप जाऊन उद्धव ठाकरे भेटले. माझ्या मुलाला वाचवा म्हणून गपचूप जाऊन भेटताय आणि आज त्यांनाच तुम्ही शिव्या घालत आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहे? देशाच्या पंतप्रधानाबद्दल तुमची लायकी तरी आहे का? अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक