नवी मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी यांना अटक करण्यात आली आहे. ऐरोलीतील (Airoli) माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी (M K Madhavi Arrested) यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. ऐरोली सेक्टर 5 मधील कार्यालयातून एम. के. मढवी यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठेकेदाराला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एम के मढवी यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. एम. के. मढवी यांना अटक करून ठाणे नेण्यात आल्याचं समजत आहे.
उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अटकेत
शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयत. आता उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला ताब्यात घेण्यात आल्याने ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे एम के मढवी यांना अटक
नवी मुंबई या ठिकाणी एम के मढवी यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आलं आहेत. एम के मढवी यांचे पत्नी आणि दोन मुलं देखील खंडणी विभागात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार हे दुर्दैव, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली