Mahad Fire : रायगड MIDC केमिकल कंपनीतील 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, तीन दिवसानंतर सर्व मृतदेह सापडले
Raigad Mahad MIDC fire : या कंपनीत एनडीआरएफने तीन दिवस सर्च ऑपरेशन राबवले होतं. त्यानंतर आता सर्व मृतदेह सापडले आहेत.
रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील (Raigad Mahad MIDC fire) केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एनडीआरएफच्या तीन दिवसांच्या शोधकार्यानंतर सर्व 11 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या कंपनीत गॅस गळतीमुळे (Gas leakage) आधी स्फोट झाला आणि मग आग भडकली होती.
महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) आग लागल्यानंतर सुरूवातीला 11 कामगार अडकल्याची भीती होती. तर पाच जणांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर रविवारपर्यंत 9 जणांचे मृतदेह सापडले होते तर दोन मिसिंग होते. आता सर्वच्या सर्व 11 कामगारांचे मृतदेह हाती लागले आहेत.
NDRF चे सर्च ऑपरेशन (NDRF Search operation at Mahad)
दरम्यान शुक्रवारी सकाळी स्फोटानंतर कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने NDRF पथक बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी हे पथक घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने रात्री 11.30 च्या सुमारास कंपनीत ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी त्यांना आधी 4 मृतदेह सापडले. नंतर एक एक करुन आणखी 3 मृतदेह हाती लागले. त्यानंतर रविवारी आणखी दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आले. तर सोमवारी सर्व 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
रात्री काय काय घडलं? (Mahad Fire Update)
- महाड एमआयडीसीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीतील एका प्लांटमध्ये शुक्रवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटामध्ये 11 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती.
- सकाळी साडेदहावाजता स्फोट झाल्यानंतर जवळपास बारा तासानंतरही आपल्या माणसांची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासन, नातेवाईकांना देत नसल्याने नातेवाईकांनी गदारोळ केला.
- नातेवाईकांची पोलीस प्रशासनासोबत बाचाबाची झाली. त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत हे पहाटे साडेतीन वाजता MIDC मध्ये येऊन त्यांनी कामगारांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
- संतापलेले नातेवाईक कंपनीच्या गेटवर चढून आत गेले.
- संतापलेल्या नातेवाईकांना शांत करण्यासाठी NDRF अधिकाऱ्यांनीही चर्चा केली.
ही बातमी वाचा: