एक्स्प्लोर

Amol Kolhe : शरद पवारांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढला पाहिजे; खा. अमोल कोल्हेंची जोरदार टीका

Amol Kolhe On Ajit Pawar : ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो असं म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. 

रायगड: शरद पवार यांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढलं पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. तुमच्यासाठी पवार साहेबांनी काय नाही केलं असा प्रश्नही विचारला. ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो असं म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. 

काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे? 

दिल्लीच्या तक्ता समोर जुकायचं नसतं. हा स्वाभिमान रायगडच्या पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेक सोहळा घेवून दाखवला आणि डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर दाखवला . उत्तरेत जरी श्री राम असला तरी महाराष्ट्रामध्ये पंढरपुरचा जय श्री विठ्ठल आहे. शरद पवार यांना काय केलं असा प्रश्न विचारला जातो. त्याच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवार साहेबांनी काय नाही केले. 

अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटलांवर टीका करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, जुन्नर आंबेगावचे लोक फक्त पुजाऱ्यालाच नमस्कार करायचे. आता याच पुजाऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवायला जनता तयार झाली आहे . 

दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे हे नेते आहेत. ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो. वतनदारी वाचवण्यासाठी त्या वेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते.  महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्येवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होते, तेव्हा अंध फक्त तयार होतात. पक्ष फोडून  चाणिक्य होता येत  नाही तर स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा करणारे खरे चाणक्य आहेत. 

काय म्हणाले जयंत पाटील? 

पवार साहेबांनी 25 वर्षात पक्ष मोठा केला. आपल्यातील काही जण बाहेर गेले, पण राज्यातील जनता पवार साहेबांच्या मागे आहे. पवार साहेबांवर फक्त भाजपा टीका करायचे काम करते . त्यांना पवारांची भीती वाटते. पवार राज्यात भाजपाचा अश्वमेध आडवू शकतात . म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते . त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते.

आरक्षणाबाबतची भूमिका सरकारने एकमुखाने सांगावी, वेगवेगळे बोलू नये असं म्हणत जयंत पाटील म्हणाले की, सरकारमधील मंत्रीच सांगतो ओबीसीवर अन्याय होत आहे.1993-94 नंतर पवार थेट सत्तेत स्वतः सत्तेत नाहीत, तुम्हीच होता सत्तेत. 

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी , इंडिया आघाडी भक्कम करा, जिल्ह्यातील सर्व विधानसभा, लोकसभा जिंकायची आहेत असं आवाहनही जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 04 Dec 2024 : ABP MajhaUddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special ReportJankar vs Satpute  : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special ReportABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget