एक्स्प्लोर

ज्येष्ठ साहित्यिक 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचं निधन

कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. उत्तम बंडू तुपे यांच्या बिकट यांच्या हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने जगासमोर आणल्यानंतर त्यांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरु झाला होता.

पुणे : आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे ज्येष्ठ साहित्यकार झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. उत्तम बंडू तुपे त्यांच्या अतिशय गाजलेल्या 'झुलवा' कादंबरीमुळे झुलवाकार म्हणून ओळखले जात .शिवाय त्यांच्या इतरही अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळालेआहेत . 'आंदण' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. 'काट्यावरची पोटं ' या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला होता.झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी ,भसम, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी त्यांच्या 'झुलवा'कादंबरीवर साकारलेल्या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या.या दोघांचा अभिनयाचा प्रवास येथूनच सुरु झाल्याचे बोलले जाते. लेखक उत्तम तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत गेल्या अनेक महिन्यापासून ते पक्षाघातामुळे आजारी होते.त्यांची पत्नी जिजा यांचाही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे मृत्यू झाला होता.उत्तम तुपे यांनाही त्रास वाढल्यामुळे 2 दिवसांपूर्वी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.आज अखेर झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं आहेत. उत्तम बंडू तुपे यांची साहित्य संपत्ती कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली आहेत. उत्तम बंडू तुपे यांच्या बिकट यांच्या हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने जगासमोर आणल्यानंतर त्यांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरु झाला होता. तत्कालीन राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पुण्यातील त्यांच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत केली होती.  त्याआधी मातंग समाजातर्फे उत्तम बंडू तुपे यांना एक लाख रुपयांची मदत केली होती.  त्यानंतर पुण्यातील ज्या वाकडेवाडी भागातील झोपडीवझा घरात बंडू तुपेंच सगळं आयुष्य गेलं त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी घर देखील बांधून दिलं गेलं होतं.  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उत्तम बंडू तुपेंना घर हस्तांतरीत केलं होतं. प्रख्यात लेखक उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्यातील अस्वस्थ संध्याकाळ | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget