एक्स्प्लोर
ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे कालवश

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांचं आज पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. संतसाहित्याचे अभ्यासक, भारतीय इतिहासाबद्दल ढेरेंनी उल्लेखनीय लेखन केलंय. भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची साहित्यक्षेत्रात ओळख होती. प्राच्यविद्या संशोधनाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. ढेरे यांच्या निधनानं साहित्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे. साहित्य परिषदेत ढेरेंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग






















