एक्स्प्लोर

'त्या' शोभायात्रेत काहीच गैर नाही, विहिंपचा दावा, गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवरच कारवाईची मागणी

विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत, हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला होता.

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये काढलेल्या शोभायात्रेत काहीच गैर नसल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. इतकंच नाही तर शोभायात्रेविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवरच कारवाईची मागणीही केली आहे. शोभायात्रेच्या वादावर बोलण्यासाठी विहिंपने आज पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत उलटी भूमिका मांडताना पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद उरकली. विश्व हिंदू परिषदेने पिंपरीत काढलेल्या सशस्त्र शोभायात्रेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितल्याचा दावा केला आहे. मात्र शोभायात्रा आणि शौर्य प्रशिक्षण वर्गात तलवार आणि एअर रायफलचा वापर केला जाईल हे मात्र अर्जात नमूद केलं नव्हतं. यावर पत्रकारांनी शंका उपस्थित करताच हात जोडून विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत, हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळात ही शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झालेले होते. पिंपरीतील यमुनानगरमधील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचं आढळून आलं होतं. शोभायात्रेवेळी एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही आला. त्याचबरोबर पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचं ही दिसून आलं होतं. याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांचा गुन्ह्यात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget