एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
वाराणसी एक्स्प्रेस 22 तास उशिराने, पुणे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा
![वाराणसी एक्स्प्रेस 22 तास उशिराने, पुणे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा Varanasi Express Late At Pune Railway Station वाराणसी एक्स्प्रेस 22 तास उशिराने, पुणे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/04102650/Pune-Railway-Station.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. वाराणसी एक्स्प्रेस नियोजित वेळेच्या 22 तासांनंतरही न आल्याने पुणे रेल्वे स्टेशनवर जवळपास 800 प्रवासी खोळंबले आहेत.
वाराणसी एक्स्प्रेस दहा तास उशिराने असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात 22 तासांनंतरही रेल्वे न आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
आता 22 तासांनंतर एक्स्प्रेस रेल्वे पुणे स्टेशनमध्ये दाखल झाली. मात्र, साफसफाईसाठी गेल्याने आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही संतापाचं वातावरण आहे. छटपूजेसाठी वाराणसीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
गुरुवारी सकाळी 10.45 वाजता एक्स्प्रेस वाराणसीकडे रवाना होणं अपेक्षित होतं. मात्र, आता रेल्वे प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, साफसफाईन करुन पाणी भरल्यानंतर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी एक्स्प्रेस रवाना होईल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion