एक्स्प्लोर

Uday Samant In Attack: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा मार्ग वेगळा अन् उदय सामंत दुसरीकडेच; उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा का फुटल्या?

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचाच उदय सामंत यांची गाडी एक भाग होती. मात्र उदय सामंतांनी मध्येच मार्ग बदलला होता. ताफ्यासोबत असलेला मार्ग का बदलला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Uday Samant In Attack: शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत ( यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला झाला. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पुणे दौऱ्यावर होते. दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत प्रवास करत होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचाच उदय सामंत यांची गाडी एक भाग होती. मात्र उदय सामंतांनी मध्येच मार्ग बदलला होता. ताफ्यासोबत असलेला मार्ग का बदलला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कौन्सिल हॉल - हडपसर- सासवड- जेजुरी - पुन्हा हडपसर असा सामंत यांचा प्रवास मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत प्रवास होता. मात्र संध्याकाळी हडपसरमधील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा गाडीतून आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडे निघाला तेव्हा उदय सामंत यांची गाडी या ताफ्यातुन वेगळी झाली.

पुण्यातील कात्रज चौकात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. तानाजी सावंत यांचं घरदेखील कात्रज भागात आणि आदित्य ठाकरेंच्या सभेपासून काहीच अंतरावर होतं.  मात्र कोणतीही संघर्ष घडू नये यासाठी पोलीसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी  कात्रज चौकाचा मार्ग न निवडता बिबवेवाडीचा मार्ग निवडला होता. 

मुख्यमंत्र्यांचा ताफा हडपसर- खडी मशिन चौक- कोंढवा- बालाजीनगर, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या मार्गाने आमदार तानाजी सावंत यांच्या घरी पोहचला. मात्र उदय सामंत हे एकटेच हडपसर- खडी मशीन चौक- कात्रज चौक या मार्गाने आले आणि थेट सभेच्या ठिकाणी पोहचले. कात्रज चौकात सभा आहे आणि समोर त्या सभेसाठी जमलेली गर्दी दिसत असतानाही उदय सामंत यांनी ऐनवेळेस मार्ग का बदलला? , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या हल्ल्यानंतर पुणे पोलीसांनी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर 252,120 ,307 ,332 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या गाडीच्या मागे मुख्यमंत्र्यांची गाडी येण्याची शक्यता होती. त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत देखील होते. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली असती तर त्यांच्यावर देखील हा हल्ला होऊ शकला असता, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
Payal Pawar Zhambre Death Case Pune: लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती
लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा

Embed widget