एक्स्प्लोर

चहावाला सीए सोमनाथ गिरामला अपघात, मणक्याला गंभीर दुखापत

पुणे : पुण्यातला सीए झालेला चहावाला सोमनाथ गिरामला अपघात झाला आहे. यामध्ये त्याच्या मणक्याला मार लागला असून कमरेखालच्या भागाची हालचाल होत नाही. पुण्यातील संचेती रुग्णलायात सोमनाथवर उपचार सुरु आहेत.   चहावाला सीए सोमनाथ गिरामला अपघात, मणक्याला गंभीर दुखापत   काही दिवसांपूर्वी तो आपलं मूळ गाव असलेल्या अकलूजला गेला होता. तिकडून पुण्याला परतत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला.   सोमनाथ म्हणजेच कठोर मेहनतीचं दुसरं नाव   जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत केल्यास काहीही अशक्य नाही, हे सोलापूरच्या सोमनाथने दाखवून दिलं आहे. पुण्यात चहाच्या टपरीवर काम करून सोमनाथ गिरामने अवघड समजल्या जाणाऱ्या सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटट परीक्षेत भरघोस यश मिळवलं आहे. चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर चहावाला सीएची परीक्षा का पास होऊ शकत नाही, हा प्रश्न सतत सोमनाथला सतावत होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरणास्थानी मानून सोमनाथने यश मिळवलं आहे.   घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत सीए बनला!   सोमनाथ बळीराम गिराम हा 28 वर्षीय तरूण सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सांगवी गावचा. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. सोमनाथला एक बहिण आणि एक भाऊ. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. मात्र पावसावर अवलंबून असलेली शेती नेहमीच दगा द्यायची. त्यामुळे गरिबी जीवावर बेतलेली. मात्र या परिस्थितीतही सोमनाथने स्वप्न बाळगलं होतं, सीए व्हायचं. लहानपणापासूनच चाणाक्ष बुद्धीचा सोमनाथ अभ्यासातही हुशार. मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्याला दहावीतच शाळा सोडण्याची वेळ आली होती. पण सोमनाथने शिकण्याची हिम्मत सोडली नाही. शिकण्यासाठी सोमनाथने आई-वडिलांसोबत शेतात मोलमजुरी केली.   शिक्षणासाठी रोज 36 किमी अंतर प्रवास   सोमनाथ करमाळा तालुक्यातील जेऊर इथल्या भारत हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिकला. मात्र सांगवी ते जेऊर हे 36 किमीचं अंतर तो सायकलवरून करायचा. शिकण्याची धडपड त्याला शांत बसू देत नव्हती. त्याला यशाचा डोंगर खुणावत होता. त्याच जिद्दीने सोमनाथचा प्रवास सुरू होता.  

वाचा : पुण्यात चहा विकून सोलापूरचा सोमनाथ सीए बनला !

  घरच्या परिस्थितीमुळे सोमनाथचा मोठा भाऊ आणि बहिणीचं शिक्षण अर्धवट राहिल. मात्र सोमनाथ स्वत: शेतात राबत असल्यामुळे त्याची शिक्षणाची गाडी कशी-बशी ढकलत होती. त्यातच नातेवाईकांच्या डोळ्यातही सोमनाथचं शिक्षण खुपत होतं. शिक्षण सोडून घरच्यांना हातभार लावण्याचा तगादा त्यांनी लावला होता. मात्र सोमनाथने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.   चहाच्या टपरीवर काम करु अभ्यास   सोमनाथने बारावीनंतरच्या शिक्षणासाठी पुणे गाठलं. इथं त्याने जेधे कॉलेज आणि शाहू कॉलेजमध्ये बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. मग GDCA केलं. यादरम्यानच तो कॉलेज सुटल्यावर एका दुकानावर कामाला जात होता. इथं मिळणाऱ्या पगारातून तो आपलं शिक्षण पूर्ण करत होता. पुढे त्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून M.Com ची पदवी मिळवली. पण सोमनाथचं ध्येय वेगळंच होतं. सोमनाथने सीए परीक्षेची तयारी सुरु केली होती. एका सीए फर्ममध्ये इंटर्नशिप करत होता. पण सीए परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं, क्लास यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग सोमनाथने सदाशिव पेठेतच चहाची टपरी थाटली. या टपरीतच काम करता-करता सोमनाथचा अभ्यास सुरु होता. दिवसभर चहाच्या टपरीवर काम आणि रात्री 5 ते 7 तास अभ्यास असा दिनक्रम सुरु होता.   मोदींच्या संघर्षातून प्रेरणा   सोमनाथने सीएची परीक्षा दिली. नुकताच 17 जानेवारीला या परीक्षेचा निकाल हाती आला. सोमनाथला 55 टक्के गुण मिळाले आणि सोमनाथ सीए बनला.सोमनाथच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र दोन वर्षांपूर्वी सोमनाथने पंतप्रधान मोदींच्या आयुष्याची कहाणी पेपरमध्ये वाचली. मोदींचा संघर्ष ते यश पाहून सोमनाथला प्रेरणा मिळाली. त्यामुळेच सोमनाथनेही मेहनत घेतली.   सोमनाथला आता स्वत:ची सीए फर्म सुरु करून एक नामांकित सीए बनायचं आहे. मात्र त्याचवेळी खेड्या-पाड्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करायची आहे. शिक्षणाशिवाय परिस्थिती बदलत नाही, असा ठाम विश्वास सोमनाथला आहे.  

वाचा : पुण्यात चहा विकून सोलापूरचा सोमनाथ सीए बनला !

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget