एक्स्प्लोर

पुण्यातील हिंजवडीत TCSमधील इंजिनिअरची आत्महत्या

पुणे: पुण्यातील हिंजवडी येथील इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता त्याच भागातील टाटा कंसल्टेन्सी सर्विसेस (टीसीएस) मध्ये काम करणाऱ्या एका 23 वर्षीय आयटी इंजिनिअरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, आयटी पार्कमधील अपार्टमेंटमध्ये अभिषेक कुमार हा राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरचा असणारा अभिषेक हा टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तिथून जवळच असलेल्या आयटी हबमधील फेज 3 मध्ये असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये तो काही रुममेट्ससोबत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि त्याचे रुममेट हे त्याच अपार्टमेंटमध्ये होते.  त्यावेळी अभिषेक त्यांना म्हणाला की, 'मला झोपायचं आहे, मी बेडरुममध्ये जाऊन झोपतो.' असं म्हणत त्यानं बेडरुम आतून बंद करुन घेतला. त्यानंतर काही वेळानं अभिषेकच्या एका मित्राचा त्याच्या रुममेटना फोन आला. त्यावेळी त्याने सांगितलं की, अभिषेकनं आत्महत्या केली आहे. या फोननंतर त्याच्या रुममेटने थेट बेडरुमकडे धाव घेतली. त्यावेळी अभिषेक त्यांना लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी थेट त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांच्या मते, आत्महत्या करण्यापूर्वी अभिषेकनं आपल्या मित्राला फोटो किंवा मेसेज पाठवला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबाबत पोलीस म्हणाले की, 'आम्हाला अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पण प्राथमिक चौकशीत असं आढळून आलं आहे की, अभिषेकचं एका मुलीसोबत ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. दरम्यान, आम्ही त्याच्या रुममेट्सचा जबाबही नोंदवणार असून अभिषेक आणि त्यांचे मोबाइल फोनही तपासणार आहोत.' संंबंधित बातम्या: इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न? हिंजवडीत महिला आयटी इंजिनिअरची हत्या, सुरक्षारक्षक ताब्यात रसिलाच्या हत्येमागे वरिष्ठांचा हात असू शकतो : वडिलांचा दावा ‘एक टक का बघतोस,’ जाब विचारल्याने इन्फोसिसच्या इंजिनिअरची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget