एक्स्प्लोर
स्पेलिंग चुकलं म्हणून शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
पिंपरी चिंचवडमधील स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 मार्च रोजी हा प्रकार घडला.

पिपंरी चिंचवड : स्पेलिंग चुकल्याने शिक्षिकेने सहा वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याचं समोर आले आहे. सुमित चव्हाण असे विद्यार्थ्याचे नाव आहे. पिंपरी चिंचवडमधील स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 मार्च रोजी हा प्रकार घडला. टिशा नामक शिक्षिकेने सुमितची क्लास वर्क बुक तपासली असता, त्यात स्पेलिंग चुकल्याचे दिसून आले. तेव्हा शिक्षिकेने लाकडी डस्टरने डोक्यात मारले, तसेच पट्टीने पाठीवर मारले. ही शिक्षिका एवढ्यावरच थांबली नाही, तर सुमितचे डोके बेंचवरही आपटले. सुमितच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसत असून, याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























