एक्स्प्लोर

Mahila Ayog Helpline : महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बंद; मनसेचं थेट फडणवीसांना पत्र, दोन्ही नंबर 'नॉट एक्झिस्ट'

Mahila Ayog Helpline : महिला आयोगाचे संपर्क क्रमांक (022) 26592707, हेल्पलाईन नंबर 155209 दोन्ही नंबर डझ नॉट एक्झिस्ट दाखवत आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Death) प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावरती मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याचं चित्र आहे. आयोगाबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र, सामान्य माणसं जेव्हा लेकींच्या तक्रारी महिला आयोगाकडे करताना संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नंबरच बंद लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे आणि कारवाई तर दूरच पण निदान नंबर सुरु करण्याची मागणी केली आहे. (Vaishnavi Hagawane Death) 

दरम्यान महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बंद असल्याचं निदर्शनास आलं आहे.  एबीपी माझाने देखील हे नंबर सुरु आहेत का? याची शाहनिशा केली. मात्र, त्यावेळी देखील नंबर बंदच असल्याचं समोर आलं आहे. महिला आयोगाचे संपर्क क्रमांक (022) 26592707, हेल्पलाईन नंबर 155209 दोन्ही नंबर डझ नॉट एक्झिस्ट दाखवत आहे. मनसेने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र लिहलं आहे.

पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभागाकडे दिनांक 26 मे रोजी महिला अत्याचाराची तक्रार घेऊन पीडित महिलेचे नातेवाईक आले होते. या संदर्भात आम्ही महिला आयोगाचा फोन लावल्यावर कोणताही फोन लागला नाही. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही महिलेस कौटुंबीक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैगिक किंवा मानसिक त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड अशा कोणत्याही घटनेत अन्यायग्रस्त महिलांना तक्रारी करायच्या असतील तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29व्या वर्धापन दिनी मोठा गाजावाजा करीत टोल फ्री नंबर 155209 याची घोषणा केली, परंतु आज तो नंबर बंद असल्याने राज्यातील अत्याचारीत महिलांना उपयोग होत नसल्याची धक्कादायक परिस्थितीची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील कार्यालयाचा फोन नंबर (022-26592707 /26590739) पण बंद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटीबद्ध असल्याची फक्त पोकळ घोषणाच असून वास्तव्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारास वाचा फुटणारच नाही. अशीच सरकारी यंत्रणा असल्याचा खेद वाटतो. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा फोन लावला असता तो पण बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यातील या सुस्त निष्किय सरकारी यंत्रणेवर महाराष्ट्रातील महिला कश्या काय अवलंबून राहू शकतात? याचे गंभीर वासव्य समोर येत आहे. 

सदरच्या विषयात राज्याची सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील बेजबाबदार असल्याचे चित्र स्पष्ट होते. शासनाच्या अश्या असंवेदनशील वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण नर्वा जनहित कक्ष विधी विभाग निषेध करीत आहे. महाराष्ट्रातील अत्याचारीत महिलांना न्याय देण्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विधी विभागाच्या वतीने मोफत कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येणार आहे. दर शुक्रवारी दुपारी 4 ते 6 यावेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय नवी पेठ पुणे येथे अत्याचारित महिलांनी पुढील व्हाट्सअॅप क्रमांकावर संपर्क (9326787778) साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे बंद टोल फ्री नंबर, कार्यालयाचे नंबर याची अधिकृत सुरु करण्याची शासनास सुबुद्धी देवो हि नम्र विनंती", असं पत्र मनसेने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. 

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Embed widget