मावळ, पुणे : मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang barne) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Waghere )यांच्यात कायम शाब्दिक चकमक होताना दिसते. एकमेकांवर वार पलटवार करताना दोघेही दिसत आहे. प्रचाराला काहीच दिवस शिल्लक असताना थेट टीका करताना दिसत आहे. त्यातच मी तर मावळ लोकसभेतील अनोळखी उमेदवार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवलं होतं का? अशी मार्मिक टिप्पणी महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंनी केली. 
 
संजोग वाघेरे म्हणाले की,  "अब की बार, फिरसे अप्पा बारणे खासदार" असा नारा बारणेंनी स्वतःसाठी दिला असला, तरी जनतेने "अब की बार, महाविकासआघाडीचा उमेदवार" हे ठरवलं आहे, असा ठाम विश्वास वाघेरेंनी व्यक्त केला. दिल्लीवरून सहा जणांचं पथक मावळ लोकसभेत येतं, यातूनच बारणेंवर महायुतीचा विश्वास राहिला नाही. हे स्पष्ट होतं. 
बारणेंसारखे नारे खूप मी ऐकलेले आहेत आणि याच्यामध्ये जनता मतदार राजा हा आपकी बार महाविकास आघाडी का उमेदवार असाच नारा आज मतदार राजांनी दिलेला आहे, असंही ते म्हणाले. 


तुम्हाला ओळखत नाही असं बारणे अनेकदा या ठिकाणी म्हटले आहेत. अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी नरेंद्र मोदींना सभा घ्यावी लागते, असं विचारल्यावर त्यांनी बारणेंवरच निशाणा साधला आहे. मी मोदींचा आदर करतो. त्यांच्यासंदर्भात मला काही टिपण्णी करायची नाही. बारणे जर समोरच्या उमेदवाराला ओखळत नाही तर त्यांनी मोदींना प्रचारासाठी यावं, असं मोदींना का सांगितलं. त्यासोबतच मोदींना सभेसाठी यावे लागते  याच्यातच आपण ओळखून घ्यावं की त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतोय, असा टोलाही त्यांनी बारणेंना लगावला. 


 वाघेरेंचा जोरदार प्रचार सुरु


मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला जात आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक, सोसायट्यांमध्ये जाऊन मशाल‌ चिन्ह पोहोचवले जात संजोग वाघेरेंना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.


इतर महत्वाची बातमी-


कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस


Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.


Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ