एक्स्प्लोर

Chandrakant Patil : आढावा बैठकीत शरद पवारांकडून संघाचं कौतुक; चंद्रकांत पाटील म्हणाले, 'शरद पवार साहेबांचं दुर्दैव...'

Chandrakant Patil on Sharad Pawar: शरद पवारांनी संघाच्या प्रचाराचे कौतुकही केलं, त्यानंतर नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसीय आढावा बैठकी पार पडली. यावेळी लोकसभेतील चांगल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीला आपण गाफील राहिल्याची कबुली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेतलं घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला. दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी गेले, हिंदुत्वाचा प्रचार केला आणि दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रुपात त्यांना मिळाल्याचे शरद पवार यांनी भाषणातून म्हटले. त्याचबरोबर शरद पवारांनी संघाच्या प्रचाराचे कौतुकही केलं, त्यानंतर नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे...

शरद पवारांनी केलेल्या कौतुकावरती प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले, 'शरद पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे, त्यांनी स्तुती केली तरी सुद्धा तुम्हाला शंका येते, त्यांनी टीका केली तरी तुम्हाला शंका येते. पण ते मात्र खमके आहेत. तुम्ही त्यांना काही म्हणा ते याही वयात कामच करत असतात, त्यांनी स्तुती केली तर चांगलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे का स्तुती केली अशा संशयाने का बघताय? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी मिश्किल पणे पत्रकारांना केला आहे.

नेमकं काय म्हणालेत शरद पवार?

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकुशलतेचं व संघटनाचं कौतुक केलंय. शरद पवारांकडून संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्दतीने सुरू असलेल्या कामाचा पुन्हा एकदा भाषणातून उल्लेख करण्यात आला. संघ परिवाराकडून कार्यकत्यांच्या आयुष्यातील महत्वाची 20 वर्षे घेतली तरी त्याला वाऱ्यावर न सोडता योग्य ठिकाणी आयुष्यभरासाठी समायोजन केलं जात असल्याचं सांगण्यात आलं, यावेळी त्यांनी पुणे शहराचं उदाहरण दिलं. पुण्यासारख्या शहराची विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे. मात्र, याच शहरातील प्रत्येक महत्वाच्या शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक काम करत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय, सप महाविद्यालय, मॉर्डन कॉलेज, एमइएस कॉलेजवर संघाचे कार्यकर्ते आहेत. अशा संस्थांवर अनेक वर्ष बाहेरच्या राज्यात संघासाठी काम करून पुन्हा माघारी आलेल्या लोकांना बसवलं जात आणि त्यांची आयुष्याची योग्य सोय लावली जात असल्याचे शरद पवारांनी आढावा बैठकीदरम्यानच्या भाषणात कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Vijay Wadettiwar: अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Same Sex Marriage : समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Vijay Wadettiwar: अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Same Sex Marriage : समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
Honey Rose : हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
IPO Update : क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ तब्बल 185 पट सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली,GMP कितीवर?
क्वाड्रंट फ्यूचर टेकच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, तब्बल 185 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, नगरसेवकांचा नाराजीचा सूर, म्हणाले...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं, पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर
Embed widget