शिरुर, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या इंदापूर येथे व्यापाऱ्याच्या सभेत आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊन पण तुम्ही मशिनचे बटन दाबा, असं विधान केल्यानंतर चांगलाच वादंग निर्माण झाला. अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या याच वक्यव्यावरुन आता अमोल कोल्हेंनी अजित पवारांना थेट सुनावलं आहे. जनतेच्या टँक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का? , असा सवाल अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे. 


डॉ. कोल्हे म्हणाले की, निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहे त्यामुळे निवडणूकीसाठी जनतेच्या टँक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवालच कोल्हेंनी विचारलाय. निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणं गरजेचे आहे. महागाईपासून त्याची सुटका होणं गरजेचे आहे रोजगार निर्माण होणं गरजेचे आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे जनतेच्या पैशातला निधी देऊन या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही, म्हणुन जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतलीय असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनावलं आहे. 


शिरूर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनता ही खूप सुज्ञ आहे. शरद पवार ज्या हिरीरीने महाराष्ट्रभर फिरत आहेत.  त्यांचा भार थोडासा का होईना हलका करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला मायबाप जनता फार व्यवस्थित ओळखून आहे  आणि त्यामुळे मायबाप जनता माझा बालेकिल्ला ही सांभाळून ठेवणार असल्याचा विश्वास अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केला आहे. 


अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करतील; संजय राऊत


अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांनीदेखील अजित पवारांना सुनावलं आहे. ते म्हणाले की, अजित पवार हे व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदाच करतील. हा देश सध्या व्यापारी चालवत आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यापाऱ्यांचे एजंट पेरले आहेत. त्यातलेच हे अजित पवार हे एजंट आहे.


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका.विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा... म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar: EVM मध्ये कचाकचा बटण दाबा, नाहीतर आमचा हात आखडता येईल : अजित पवार