पुणे : पाच वर्षांच्या जनसंपर्काची तुलना वीस वर्षाच्या जनसंपर्काशी का करावी, असा प्रश्न विचारच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे. 5 वर्षांच्या पैलवानाची कुस्ती 20 वर्षाच्या पैलवानासोबत होत नाही. मग पाच वर्षांच्या जनसंपर्काची तुलना वीस वर्षाच्या जनसंपर्काशी का केली जातेय, असा प्रतिप्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे.
अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा
शिरूर लोकसभेत (Shirur Lok Sabha Election 2024) अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क नाही, असा प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव आणि महायुतीचे नेते वारंवार उपस्थित करत आहेत. याला उत्तर देताना कोल्हेंनी हा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.
20 वर्षाच्या आणि 5 वर्षांच्या जनसंपर्काशी तुलना कशाला?
आता गावागावात जत्रा सुरु आहे. जत्रेत कुस्ती लावायची झाली तर, पाच वर्षाच्या मुलाची आणि 20 वर्षाच्या मुलाची कुस्ती लावायची, लावली पाहिजे ना, लावायची का नाही लावायची? नाय लावायची का, मग 20 वर्षाच्या जनसंपर्काची आणि पाच वर्षांच्या जनसंपर्काशी तुलना कशी करायची, असा सवा अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. मुद्द्याचं सोडून देतात आणि नको ते बोलतात. जनसंपर्काचं म्हणायचं झालं तर, 20 वर्षात माणूस तेवढ्या जास्त लोकांना भेटणारचं.
15 वर्ष खासदार असताना, किती आमदार निवडून आले?
2019 साली शरद पवारांच्या आर्शिवादाने खासदार अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर तोपर्यंत मतदारसंघात एकच आमदार होता, त्याऐवजी 2019 ला पाच आमदार निवडून आले, नंतर मला गणित मागच्या 15 वर्षांचं गणित कळलं, 15 वर्ष कुणीतरी खासदार असताना, किती आमदार निवडून आले, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. दोनच वर्षात 15 वर्षात निवडून आले.
5 वर्षातील कामगिरी, तुमच्या 15 वर्षांपेक्षा उज्ज्वल
20 वर्षांच्या जनसंपर्क आणि पाच वर्षांचा जनसंपर्क हा तुलना करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशाभूल केली जाते. पण, ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या लोकसभेची निवडणूक असते, ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवाता, ते काम करताना अवघ्या पाच वर्षातील कामगिरी तुमच्या 15 वर्षांपेक्षा उज्ज्वल आहे, हे मात्र तुम्ही सांगत नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
15 वर्षांत एक तरी मोठा प्रकल्प शिरुरमध्ये आणला का?
पाच वर्षात काय केलं, ते मी सांगतो, पण 15 वर्षांत एक तरी मोठा प्रकल्प तुम्ही शिरुर लोकसभा मतदारसंघात आणला का याचं एकदा तरी उत्तर द्या, असंही कोल्हे म्हणाले आहे. खेडची जनता आणि संपूर्ण परिसर खेळ विमानतळाची जखम कधीच विसरू शकत नाही, अजून तर सुरुवात आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर काढेन. पण, हे सगळं करत असताना आपल्याला मुद्द्यांवर ही निवडणूक हवी आहे, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.