पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणले जातात. मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो. याचं ताजं उदाहरण म्हणजे अजित पवारांनी इंदापूरमध्ये (Indapur) केलेलं वक्तव्य. आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले. ते इंदापुरात बोलत होते. (Ajit Pawar On EVM) 


अजित पवार म्हणाले,  आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका.विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा... म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. 


कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो, त्यांना  नीट सांभाळावे लागते : अजित पवार 


जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. मला काम करायला आवडतात.  मला आदेश द्यायची सवय झाली आहे त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते, असे देखील अजित पवार म्हणाले.


40 वर्षापासून उमेदवाराला ओळखतो, तो ढवळाढवळ करणार नाही : अजित पवार


अजित पवार म्हणाले, जो उमेदवार दिला आहे तिथल्या आमदार किंवा होऊ घातलेला आमदार असतो त्याला इच्छा असते खासदारांने ढवळाढवळ करू नये. मी 40 वर्ष झाली उमेदवाराला ओळखतो. 40 वर्षांपासून मी ओळखतो ते ढवळाढवळ करणार नाहीत ते बाहेरचे वाटणार नाही ते तुम्हाला आपले वाटतील.मतदान करताना नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवावा लागेल 


मी शब्दाचा पक्का : अजित पवार 


पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25- 50 वर्षाचा विचार करुन काम करा.  माझ्या बारामतीत सुद्धा 382 कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस काढेल कामाचा आढावा घेईल. आम्ही जो उमेदवार दिला आहे तो देखील काम करेल, असेही अजित पवार म्हणाले. 


हे ही वाचा:


 काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी