इंदापूर, बारामती : घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, असं शरद पवार (Sharad pawar) म्हणाले त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. सून सुनेत्रा पवारांच्या (Sunetra pawar) डोळ्यातंही शरद पवारांचं वक्तव्य ऐकून पाणी आलं. त्यानंतर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) इंदापूरच्या वकीलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचं नाव घेऊन 'तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात', असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला. त्यासोबतच डॉक्टरांशी सगळे खरे बोलतात. त्यामुळे तुम्ही नक्की राजकारणात काय चाललं आहे आपल्या रुग्णांना विचारा. आमचं नाव घेतलं तर जरा चांगले बोला जर दुसरे नावं घेतलं तर जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी केली
अजित पवार आज बारामती,दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. तिन्ही ठिकाणी अजित पवार डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेणार आहेत. दौऱ्याची सुरुवात इंदापूरपासून केली आहे. इंदापूरमध्ये अजित पवार वकील आणि डॉक्टरांचा मेळावा घेत आहेत. अजित पवार इंदापुरात पोहोचले त्यांच्यासोबत आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, प्रदीप गारटकर, प्रवीण माने उपस्थित आहेत.
अजित पवार म्हणाले की, आम्ही सगळेच निवडणुकीचे टप्पे व्यस्त राहणार आहोत. बाकी सगळ्यांसोबतच डॉक्टरांचे आणि वकिलांचेदेखील अनेक प्रश्न आहेत. एका डॉक्टर महिलेचं नाव घेऊन तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात, असंदेखील ते म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रात मत्तेदारी असता कामा नये. आम्ही लोकाभिमुख कामे करतो पण काही गोष्टीत आम्ही चुकू शकतो. काम करणारा चुकतो जो कामच करीत नाही तर तो चुकेल कसा?, असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
त्यासोबतच त्यांनी सुप्रिया सुळेंवरदेखील निशाणा साधला. मीच आताच्या खासदारासाठी मते मागितली पण कोणताही केंद्राचा प्रोजेक्ट इथे आला नाही, असा आरोप त्यांनी सुप्रिया सुळेंवर केला आहे. त्यासोबतच पंतप्रधना नरेंद्र मोदींना मी विरोध करत होतो. नरेंद्र मोदींना कोणीही पर्याय नाही. राहूल गांधींना पर्याय म्हणूण बघितलं तर काय होऊल हे वेगळं सांगायला नको, असंही म्हणत त्यांनी राहूल गांधींवर टीका केली.
मी वाडपी आहे...
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येत. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत तुम्ही खासदाराला निवडून दिले आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिलं तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीच हा खासदार उजवा असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाची बातमी-