पुणे: बारामती येथे राज्य शासनाच्या वतीने होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्याला (Baramati Namo Rojgar Melava) शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांच्या अधिकृत कार्यक्रमात त्या संबंधित उल्लेख आहे. नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्यास आपल्याला आवडेल अशा आशयाचं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलं असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमधील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी जेवणाचंही निमंत्रण दिलं आहे.
शनिवारी, 2 मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी काढण्यात आलेल्या पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण या राष्ट्रवादीच्या खासदारांची नावं आहेत, पण शरद पवारांचं मात्र नाव नाही.
शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून त्यांचे नाव या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
शरद पवारांच्या कार्यक्रमात उल्लेख
बारामतीच्या कार्यक्रमाचा उल्लेख हा शरद पवारांच्या कार्यक्रमाच्या नियोजनात असल्याचा उल्लेख आहे. शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या दृष्टीने शरद पवार हे शुक्रवारी रात्रीच बारामतीमध्ये येणार आहेत.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकराच्या मैदानावर बारामती नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.
ही बातमी वाचा: