पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे येत्या 2 तारखेला अजित पवारांचा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील महत्वाचे तीन नेते बारामतीमध्ये येणार आहेत. रोजगार मेळाव्यासोबतच पोलीस उपमुख्यालय, बस स्थानक, पोलीस वसाहतिचे उद्घाटन होणार आहे. पण या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या कार्यक्रमाला जाणार का? हा प्रश्न आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे सुळे यांनी म्हटलं आहे. पण शरद पवारांनी या कार्यक्रमासाठी वेळ राखून ठेवला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामती आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. पण या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थिती लावणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुळे यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे सांगितले आहे. पण खासदार सुप्रिया सुळे यांना याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी संदिग्ध उत्तर दिलं आहे. येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर आहेत..निमित्त आहे पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचे. हा रोजगार मेळावा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.
या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे
बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे ही संस्था 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे पण या शासकीय कार्यक्रमाचे आमंत्रण अद्यापही बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आलं नाही.. पण या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी वेळ राखुन ठेवला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत तसेच पाच जिल्ह्यातील युवक युवती रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणारे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रोजगार मेळावा शासनाचा असला तरी या कार्यक्रमात राजकिय भाषणं होणार आणि यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकले जाणार का हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच जर शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर या कार्यक्रमाचे स्वरूपच बदलून जाईल.
इतर महत्वाची बातमी-
Baramati Supriya Sule : नमो रोजगार मेळाव्याचं आमंत्रण आलंच नाही; आलं तर नक्की जाईन: सुप्रिया सुळे