एक्स्प्लोर

Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; एकमेकांकडे बघणंही टाळलं, कार्यक्रमात काय घडलं?, VIDEO

Ajit Pawar & Sharad Pawar: अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेत. मात्र, यांनी एकमेकांकडे बघितले देखील नाही, शिवाय नमस्कार करणं देखील टाळलं असल्याचं दिसून आलं आहे.

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीत एकाच मंचावरती आले असल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघं एकाच मंचावर आले आहेत. या निमित्त बारामतीत निवडणुकांनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले आहेत. त्यामुळं सर्व राजकीय विश्वाचं लक्ष्य या कार्यक्रमाकडे लागलं आहे. पवार काका-पुतणे एकाच मंचावर आले, मात्र अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांकडे बघितले देखील नाही. शिवाय एकमेकांना नमस्कार करणं देखील टाळल्याचं दिसून आलं. 

अजितदादा-शरद पवार यांची आसनव्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही

अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले असले तरी देखील त्यांची आसन व्यवस्था एकमेकांच्या शेजारी करण्यात आलेली नाही. अजितदादा आणि शरद पवार यांची आसनव्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही. अजितदादा आणि शरद पवार यांच्या खुर्ची शेजारी अजित जावकर यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आलेली आहे. तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या खुर्चीत अंतर आहे. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार यांच्यात संवाद होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार शेजारी-शेजारी 

लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकींच्या विरोधात लढलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या देखील आज एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं. या दोघी नणंद-भावजय या शेजारी-शेजारी बसल्या आहेत. बारामती लोकसभेची निवडणूक त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. त्यानंतर आता त्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमात त्या एकत्र आल्या आहेत. 

बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र येणार का? संवाद साधणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान त्यांनी एकाच मंचावर येताच एकमेकांकडे कटाक्ष टाकणं देखील टाळल्याचं समोर आलं आहे. यावेळी रोबोटकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं, यावेळी अजितदादाचा सत्कार करण्यासाठी रोबोटने स्टेजवर बुके आणलेत, स्टेजवर रोबोट आल्यावर अजितदादा खळखळून हसल्याचंही दिसून आलं.

 

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget