एक्स्प्लोर

ससूनचे अधिष्ठाता डाॅ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर निवासी डॉक्टरांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

पुण्यातील ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला ससूनच्या रेसिडेंट डाॅक्टरांनी विरोध केला आहे. ससूनमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुणे : पुण्यातले ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. चॅदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला ससूनच्या रेसिडेंट डाॅक्टरांनी विरोध केला आहे. डाॅ. चंदनवाले यांची बदली ही अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. निवासी डाॅक्टर आणि इतर कर्मचारी यांची मिटींग घेऊन त्यामध्ये पुढची भूमिका ठरवली जाईल असं मार्ड (ससून) तर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ससून हाॅस्पिटलमधील नर्सेस, फॅकल्टी, निवासी डाॅक्टर, क्लास 3, क्लास 4 कर्मचारी, सफाई कर्मचारी हे हाॅस्पिटलच्या आवारात असलेल्या बीजे मेडिकल काॅलेजच्या इमारतीसमोर जमा झाले होते.  दरम्यान ससूनमधे अचानक आंदोलन सुरू करण्यात आल्यामुळे पोलिसांना बोलवावं लागलं. त्यानंतर आंदोलन करणारे डॉक्टर आणि कर्मचारी पांगले.

ससून रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप

डॉक्टर अजय चंदनवाले हे दहा वर्षांहून अधिक काळ ससुन रुग्णालयात ठाण मांडून आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची मुंबईला बदली करण्यात आली होती. पण चारच महिन्यांत ते पुण्यातील ससूनचे अधिष्ठाता म्हणून परत रुजू झाले. ससूनमधे कोरोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आरोप ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप होऊ लागले होते.  प्रशासकीय अधिकाऱ्यांची  चंदनवाले यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली. काल जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कारवाईचे संकेत दिले होते आणि संध्याकाळीच चंदनवाले यांची  बदली झाली. पण या बदलीला विरोध करत निवासी डॉक्टरांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिलाय. आता विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी या निवासी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावलं आहे. ससूनचे अधिष्ठाता डाॅ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर निवासी डॉक्टरांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा दरम्यान, डॉ. चंदनवाले यांच्याकडे मुंबईतील वैद्यकीय शिक्षण सहसंचालक, आरोग्य या पदाचाही कार्यभार आहे. त्या पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी डॉ. चंदनवाले यांना देण्यात आले आहेत. डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर  सह-अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे ससूनचा पदभार सोपवण्यात आला होता.  पण डॉक्टर तांबे हे स्वतःच आजारी असल्याचं सांगण्यात आल्यानंतर ससूनचा कार्यभार ससूनच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डाॅ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Pune #Corona | कोरोनाचे रुग्ण एकाच छताखाली आणण्यासाठी ससून रुग्णालयात नव्या इमारतीचे प्रयत्न

पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळपर्यंत 427 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 43 रुग्णांचा या आजाराचा सामना करत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पुण्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे 10.07 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. Pune Corona Death | पुण्यातील ससून रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू, ससूनमध्ये आतापर्यंत 35 कोरोनाचे बळी

महत्त्वाच्या बातम्या

उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड 
उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड 
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Embed widget