Samriddhi Highway Accident : निष्पापांना प्राण गमवावे लागले, अपघात अत्यंत दुःखद अन् वेदनादायी; अजित पवारांकडून शोक व्यक्त
समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना अजित पवारांनी श्रध्दांजली वाहिली आहे, सोबतच या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, हे वृत्त अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Samriddhi Highway Accident : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जांबरगाव टोल नाक्याजवळ समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 23 जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना अजित पवारांनी श्रध्दांजली वाहिली. सोबतच या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, हे वृत्त अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.
नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, हे वृत्त अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर या अपघातातील जखमींवर तातडीने, सर्वतोपरी उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही ट्वीट...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देखील ट्वीट करत छत्रपती संभाजीनगरच्या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. तर अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
इतर महत्वाची बातमी-