एक्स्प्लोर

Russian Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण! खिडकीबाहेरील रणगाड्याचा आवाज येताच छाती धडधडायची; युद्धावेळी यु्क्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थीनीने सांगितला युद्धाचा थरार

युक्रेनमध्ये चर्नीवील शहरात अडकलेल्या निधी जगतापने तिचा अनुभव एबीपी माझाबरोबर शेअर केला आहे. तो आवाज आणि आम्ही पाहिलेले रणगाडे आठवले की आजही मला झोप लागत नाही असं निधी जगताप सांगते.

Russian Ukraine War :  रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा महीने पुर्ण झाले. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. या युद्धामुळे भारतातील अनेकांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. युद्ध आणि युद्धजन्य परिस्थीती आपल्यातील अनेक लोक बघतात किंवा ऐकतात मात्र भारतातील अनेक विद्यार्थी या युद्धजन्य परिस्थितीत अडकले होते. त्यांनी युद्धजन्य परिस्थिती अनुभवली आणि त्यातून सुखरुप बाहेरही आले मात्र त्यांच्या या युद्धाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम आणि त्यांनी अनुभवलेल्या युद्धाचा थरार कधीही न विसरण्यासारख्या आहे. याच युद्धात चर्नीवील शहरात अडकलेल्या निधी जगतापने तिचा अनुभव एबीपी माझाबरोबर शेअर केला आहे. तो आवाज आणि आम्ही पाहिलेले रणगाडे आठवले की आजही मला झोप लागत नाही, असं निधी जगताप सांगते.

मी तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होते.त्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. युद्धाला सुरुवात होताच भारताचे-आपल्या पुण्याचे, घरचे वेध लागले. त्यामुळे धोका पत्करून  आमचा प्रवास सुरू झाल. आमचे विमान कतारवरून होते. मात्र युद्धामुळे विमान रद्द झाले, त्यामुळे आम्हाला रोमानिया बॉर्डरवर यावे लागले. काही काळ भारतीय दुतावासांशी संपर्क होत नव्हता यासाठी 30 कि.मी. पायपीट केली. तेव्हा युक्रेनमध्ये बर्फवृष्टी होत होती. युद्ध काय असते ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले. जीवाचा थरकाप उडत होता, असं म्हणत तिने युक्रेन युद्धाचा थरार सांगितला.

माझ्या होस्टेलच्या बाहेर फार युद्धजन्य वातावरण होतं. खिडकीतून बाहेर बघितलं की रणगाडे दिसायचे. आम्ही जीव मुठीत घेऊन तिथे दिवस काढले. त्यानंतर आम्ही भारतात येण्यासाठी प्रचंड प्रयत्नात होतो. भारतीय राजदूतांना आणि कॉलेजशी संपर्क साधून आम्हाला भारतासाठी तिकीट मिळालं . आमची 30 जणांची तुकडी होती. आम्ही सगळे बसने रोमानिया शहराकडे निघालो. वाटेत कधी जीव जाईल याचा नेम नव्हता भररस्त्यात फायरींग सुरु होतं. बसवर भारताचा तिरंगा होता. तोच तिरंगा आमचं संरक्षण करत होता. आमची उमेद टिकवून ठेवण्याचं काम करत होता. त्याच बसमधून आम्ही सुखरुप रोमानियाच्या विमानतळावर पोहचलो, असं निधी सांगते.

अखेर मायदेशी परतलो
जीव मुठीत घेऊन दिल्ली विमानतळावर पोचल्यावर बरे वाटले. पुण्यात आल्यावर आणि आई-वडिलांना पाहून अश्रू वाहू लागले. युक्रेनमध्ये त्यावेळी माझे अनेक मित्र मंडळी अडकली होती. त्याचे आई वडीलांचे डोळे त्यांच्या येण्यावर लागले होते. मी सुद्धा त्यावेळी सतत त्यांच्या संपर्कात होते. यापुढील शिक्षणाचं काय होईल माहित नाही मात्र युद्ध यापुढे कुठेच होऊ नये, असं ती पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget