पुणे : पुणे महापालिकेच्या विस्तरीत इमारतीचं आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पण ऐन उद्घाटनाच्या कार्यक्रमातच पालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना, ज्या नवीन सभागृहात कार्यक्रम सुरु होता त्यातील एका कोपऱ्यात पाणी गळायला सुरुवात झाली.
पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या वेळेस पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती आणि पहिल्याच जोरदार पावसात पालिकेची ही नवीन इमारत गळायला सुरुवात झाली.
एकीकडे मुख्यमंत्री आणि उपराष्ट्रपती नवीन सभागृहाचे कौतुक करत असताना, दुसरीकडे मात्र नवीन सभागृहात पाणी गळत होतं.
महापालिकेची ही इमारत अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे आरोप महापौर मुक्ता टिळक यांनी फेटाळले. गच्चीवर कचरा साठला होता आणो त्यामुळे पाणी साचून पाणी गळाले असल्याचे महापौरांनी सांगितले.
आज सकाळी अजित पवार यांनी सकाळी पालिकेच्या नवीन इमारतीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी इमारतीच्या उद्घाटनची घाई केल्याचं सांगून इमारतीच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं पुणेरी पगडी घालून महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुणेरी पगडी घालून स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्वागत केलं.
पवारांच्या अनुपस्थीतीची चर्चा
पुणे पालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उदघाटन प्रसंगी शरद पवार यांच्या अनुपस्थितीमुळे भुवया उंचावल्या गेल्या. बारामतीमध्ये कार्यक्रम असल्याने शरद पवार येऊ शकले नाहीत आणि याविषयी दोन दिवसांपूर्वी आयोजकांना कल्पना देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीकडून देण्यात आलं. तर शरद पवारांच्या अनुपस्थितीविषयी महापौर मुक्ता टिळक यांना विचारलं असता, मी त्यांना पर्सनली आमंत्रण दिलं होतं ते का आले नाही ते शरद पवारच सांगू शकतील असं स्पष्टीकरण मुक्ता टिळक यांनी दिलं.
उद्घाटनाच्या दिवशीच पुणे पालिकेच्या विस्तारित इमारतीतून पाणीगळती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2018 10:56 PM (IST)
महापालिकेची ही इमारत अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे आरोप महापौर मुक्ता टिळक यांनी फेटाळले. गच्चीवर कचरा साठला होता आणो त्यामुळे पाणी साचून पाणी गळाले असल्याचे महापौरांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -