पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका-पुतण्यांमध्ये (NCP) वादावादी आणि टीका टीपण्णी सुरुच असल्याचं चित्र आहे. अजित पवार (Ajit Pawar आणि रोहित पवार (Rohit Pawar) एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. त्यातच रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची बोचरी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे, पण सध्या मात्र ते बारामतीत अडकले आहेत असं रोहित म्हणाले. अजित पवार हे शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा महाराष्ट्रभर फिरायचे पण मात्र सध्या ते बारामतीमध्ये अडकलेले आहे. भाजपने अजित पवारांना लोकल नेत बनवलं आहे. शरद पवारांच्या वयासंदर्भात कायम बोललं जातं आज आमचा 70 वर्षाचा य़ुवा नेता राज्यभर 40 ते 50 सभा घेणार आहेत. मात्र अजित पवार फक्त बारामतीत फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रभर अजित पवारांनी बोलू नये, अशी भाजपती इच्छा आहे. अजित पवारांसंदर्भात राज्यात नकारात्मक वातावरण भाजपमध्ये निर्माण झालं आहे त्यातच बारामतीत अजित पवारांचा उमेदवार तीन लाखांनी मागे दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले.
काका पुतण्यात टीका-टीपण्णी संपेना!
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांचे सोशल वॉर आणि टीका टिपण्णी करताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यापासून पवारांच्या दोन्ही काका पुतण्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं बघायला मिळालं. शरद पवारांनी घरातले पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्याने सुनेत्रआ पवार आणि अजित पवारांच्या मनाला लागलं. त्यानंतर सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. यालाच उत्तर देताना शरद पवारांनी वाक्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं. त्यासोबतच रोहित पवारांनीदेखील अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. कधी राजकारणावरुन , कधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरुन तर कधी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसत आहेत.
इतर महत्वाती बातमी-
-'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
पाहा व्हिडीओ: