Ajit Pawar : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) झाली की, विधानसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) वेळी आम्ही सांगू तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला सांगितले आहे. त्यांच म्हणणं मी मान्य केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या घरी अजित पवार सहकुटुंब भोजनासाठी गेले होते, यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. सहकारामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा विश्वास अमित शहा यांनी संपादित केला असल्याचे अजित पवार म्हणाले. 


2004 ते 2019 पर्यंत हर्षवर्धन पाटील वरिष्ठांशी चर्चा करत होते


2004 ते 2019 पर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करत होते असंही अजित पवार म्हणाले. 2019 मध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शाह, प्रफुल्ल पटेल यांच्याशी एकत्र बसून चर्चा केली होती. त्यावेळी मला अमित शाह म्हणाले होते की, चर्चा होती पण शब्द पाळला जात नाही तुम्हाला पाळावा लागेल. मुंबईत आल्यावर वेगळीच चर्चा सुरू झाली. मी त्यांना सांगितले की, मी शब्दाचा पक्का आहे. मला सांगा कधी शपथ घ्यायची, मी आठ वाजता शपथ घेतल्याचे अजित पवारांनी सांगितले. 


जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू


मी इंदापूरमध्ये बोललो ते ग्रामीण भाषेत बोललो. तेच पुण्यात असतो तर तिथं कचा कचा नाही चालत. ज्या भाषेत चालतं तसेच बोलावं लागते असंही अजित पवार म्हणाले. जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू असेही अजित पवार म्हणाले. इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील त्याला मी उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. इतर पक्ष वेगळे आहेत. पण भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या पक्षात आलबेल असायचे. चला रे चला रे हौशे नवशे गवशे असल्याचे अजित पवार म्हणाले. 


मोदींच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही


ज्यांच्याकडून निधी घ्यायचा त्यावर टीका करता ते कसे ते पैसे देतील? असा सवालही अजित पवार यांनी विरोधकांना केला. भूमिपूजन त्यांनीच केलं उद्घाटन देखील तेच केलं असा नेता असावा लागतो. नाहीतर राजकारणी असतात निवडणूक आली की नारळ फोड परत पुढची निवडणूक आली की नारळ फोड असे अजित पवार म्हणाले. मोदी परत निवडून आले तर संविधान बदलतील असंही विरोधकांकडून सांगितलं जात आहे. चुकीची वक्तव्य केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले. मोदींच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही. त्यांच्यावर कुठलातरी आरोप झाला का? मोदी पारदर्शकपणे काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. 


सगळेजण महायुतीचे काम करतील


दरम्यान, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाला मतदान करायचं आणि जिथं कमळ असेल तिथं कमळाला आणि जिथं धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाला मतदान करायचे असेही अजित पवार म्हणाले. सगळेजण महायुतीचे काम करतील असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, मला अजून दोन बैठका घ्यायच्या आहेत. त्यामध्ये एक माढ्याची आहे आणि दुसरी भोरची आहे, असंही अजित पवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


सध्या अजित पवार गटात आहे, पण बारामतीत अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार, उत्तम जानकरांचा हल्लाबोल