एक्स्प्लोर

Rohit Pawar : पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 

Rohit Pawar On Ajit Pawar Accident : एकीकडे आम्ही अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी प्रामाणिकपणे लढतोय, पण अशा गोष्टी पाहिल्यानंतर लढायचं की नाही असा प्रश्न पडतोय, असं रोहित पवार म्हणाले. 

मुंबई : अजित पवारांचे अपघात प्रकरण सातत्याने लावून धरणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. पार्थने व्हीएसआर विमानातून प्रवास केला, तर एका कार्यक्रमात सुनेत्राकाकी या नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्या शेजारी बसल्याने या विषयावर कुणाशीही चर्चा करायची इच्छा नसल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. सुनेत्रा पवारांनी जर अजितदादांच्या अपघाताची चौकशी लावली तर त्यांचा सत्कार करेन असंही रोहित पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी व्हीएसआर विमानातून प्रवास केल्याचं समोर आलं. याच कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवारांचा अपघात झाला होता. आमदार रोहित पवारांनी त्यानंतर व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोप केले होते. तर दुसरीकडे, या विमानाच्या मालकाचे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांचे संबंध असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्याचं दिसून आलं. त्यानंतर आमदार रोहित पवारांनी त्यावर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आता या दोन्ही विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

चर्चा करायची इच्छा नाही

आमदार रोहित पवार म्हणाले की, "पार्थ पवारने व्हीएसआर विमानातून प्रवास केला. तर काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार या राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्याचं दिसून आलं. या विषयावर मी कुणाशीही चर्चा केली नाही, तशी इच्छादेखील नाही. अजितदादांच्या अपघाताच्या प्रश्नी आम्ही न्यायालयात जातोय, सीआयडीकडे जातोय. लोकांपर्यंत जाऊन प्रामाणिकपणे लढतोय. असं असताना या गोष्टी समोर दिसतात त्यावेळी आम्ही लढायचं की नाही असा प्रश्न पडतो."

अजितदादांच्या अपघाताची केस जर येत्या 28 मे पर्यंत सीबीआयला राज्य सरकारने सुपूर्त केली तर मी स्वतः सुनेत्राकाकींचा सत्कार करेन, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. 

तटकरेंच्या भेटीत चर्चा काय? 

दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. ही भेट पवारसाहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घेतली होती अशी माहिती तटकरेंनी दिली. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. 

रोहित पवार म्हणाले की, "मला जी माहिती मिळाली त्यानुसार सुनील तटकरे यांच्यासोबत प्रफुल पटेलही त्यावेळी उपस्थित होते. परंतु, पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसेल. ती भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यासाठी झाली असेल."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
Pune Rada : राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस- ABVP कार्यकर्ते भिडले, सीओईपी कॉलेजवर मोठा राडा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस- ABVP कार्यकर्ते भिडले, सीओईपी कॉलेजवर मोठा राडा
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget