एक्स्प्लोर

Ajit Pawar and Rohit Pawar : अजित पवार प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी का पित होते? रोहित पवारांनी सांगितलेली ती गोष्ट चर्चेत

Ajit Pawar : रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत खळबळ उवडून देणारे दावे केले आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता अजितदादांचा विमान अपघात हा घातपात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Rohit Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघताबाबत त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक मुद्दे मांडत अजितदादा यांचा फक्त अपघात नव्हे तर तो नियोजनबद्ध अपघात होता, असा दावा देखील केला आहे. अजितदादा यांचा 100 टक्के घातपात झालेला असू शकतो असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. रोहित पवारांनी  (Rohit Pawar) त्यांचे मुद्दे मांडत असतानाच आणि दावे करताना काही फोटोंचाही आधार घेतला आहे. विमान चालवण्याचे नियम, विमान लँडिंगदरम्यान असलेला प्रोटोकॉल, पायलटचा अनुभव तसेच इतर तांत्रिक बाबींचा उल्लेख करून त्यांनी, काही पुस्तकातील दाखले देत अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी अजितदादांसोबत घातपात झाल्याची शंका उपस्थित करताना त्यांनी आजकाल काचेच्या बाटलीतून पाणी पित होते, प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं टाळतं होते, असा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी अजितदादांसोबत घातपात झालेला असू शकतो, अशी शंका उपस्थित केली. कोणताही घातपात होऊ नये यासाठी अजित पवार किती काळजी घ्यायचे, याचे उदाहरण रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी दिलं आहे. अजितदादांनी शेवटच्या काळात प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे बंद केले होते. “अजितदादा लढवय्या होते. त्यांना कोणी ब्लॅकमेल करू शकत नव्हतं. मी फक्त ते घेत असलेली काळजी सांगितली. प्लास्टिकच्या बाटलीत टॅम्परिंग होऊ शकत होतं. त्यात काही ना काही मिसळता येऊ शकतं. म्हणून दादा प्लास्टिक बाटली ऐवजी काचेच्या बाटलीत पाणी प्यायचे. ते स्वतचे काळजी घ्यायचे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

अजितदादांचं शरीर खूपच जास्त सुजलं होतं, रोहित पवारांनी काय सांगितलं?

मुंबईनंतर दिल्लीत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली होती, याबाबत रोहित पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा नवीन खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असंही ते म्हणाले. ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. तो मृतदेह अजित पवारांचा आहे का? याबाबतही संभ्रम होता, त्यानंतर आता  फुगलेल्या मृतदेहाबाबत रोहित पावरांनी माहिती देताना म्हटलं की, "डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती. मी जेव्हा त्यांना विचारलं भाजल्यानंतर शरीर सुजतं का?  त्यावर त्यांनी सांगितलं की, हो शरीर सुजते. अजित दादांची बॉडी असामान्यपणे (abnormally swollen) खूप जास्त सुजलेली होती. ती का इतकी सुजलेली होती, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं असल्याचं चित्र आहे.(Rohit Pawar) 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मराठवाडा विभागाचे संकेत सावसे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून रोहित पवारांच्या दाव्याबाबत बोलताना म्हटलं की, दादांनी मागील काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची बॉटल का बदलली असेल? रोहितदादांनी दिलेली माहिती आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांमधून उघडपणे होत असलेली चर्चा यांतून दादांचा घातपात झाल्याकडे संशय बळावत आहे...! माझ्या दादाचा घातपात झाला आहे अशी मला तर शंका आहे...खरंच ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्या चितेला अग्नी देणारा कोणी उरणार नाही हीच प्रार्थना! 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanket N Sawase (@sanketsawasespeaks)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget