Ravindra dhangekar : याला म्हणतात फॅन फॉलोइंग...! धंगेकर जिंकल्याने पठ्ठ्याची खास ऑफर 'एक रोल वर एक रोल फ्री'
रविंद्र धंगेकर जिंकल्याबद्दल पुण्यातील एका व्यावसायिकानी एक रोल वर एक रोल फ्री अशी ऑफर ठेवली. पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका हॉटेल व्याव्यासायिकाने एक रोल वर एक रोल फ्री अशी ऑफर ठेवली आहे .
Ravindra dhangekar : आपल्या आवडत्या नेत्यासाठी जोरदार बॅनरबाजी, आवडत्या नेत्याचा टॅटू, आवडत्या नेत्यासाठी खास टीशर्ट छापलेले आपण पाहिले आहेत. मात्र पुण्यात जर यापेक्षा वेगळं काहीतरी झालं नाही तर पुणेकर चर्चेला कसे येणार? दरवेळी पुणेकरांच्या भन्नाट कल्पनेची चर्चा राज्यभर होते. तशीच चर्चा यंदा पुण्यात झालेल्या पोटनिवडणुकीची झाली. यात कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडून आले. रविंद्र धंगेकर जिंकल्याबद्दल पुण्यातील एका व्यावसायिकानी एक रोल वर एक रोल फ्री अशी ऑफर ठेवली. पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका हॉटेल व्याव्यासायिकाने एक रोल वर एक रोल फ्री अशी ऑफर ठेवली आहे . ही ऑफर 2 दिवसांसाठी असून या जाहिराती चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. या ऑफरचा पोस्टर आता सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
मागील अनेक दिवसांपासून पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक गाजत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत बघायला मिळाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावून प्रचार केला. भाजपकडून हेमंत रासने निवडणूक लढत होते तर काँग्रेस कडून रवींद्र धनगेकर निवडणुकीत उतरले होते. कसब्यात अनेक वर्षांपासून भाजप राज्य करत होतं मात्र यावर्षी भाजपकडून हा बालेकिल्ला निसटला. 26 फेब्रुवारीला मतदान पार पडलं आणि काल कसबा पोटनिवडणुकीचा काल निकाल लागला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. रवींद्र धंगेकर हे आमच्यासाठी कधीही काम करण्यासाठी तयार असतात अशी प्रतिक्रिया अनेक कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दिली.
पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल...
त्याचं हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. धंगेकरांच्या अनेक समर्थकांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्याची ही ऑफर दोन दिवस आहे. त्यामुळे अनेकांची या ऑफरवर ताव मारायला सुरुवात केली आहे. धंगेकर यांची सामान्यांचा नेत अशी कसब्यात ओळख आहे.त्यामुळ ते जिंकल्यानंतर पक्षांच्या नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
धंगेकरांच्या टू व्हिलर प्रचाराची चर्चा...
कसबा मतदार संघात रविंद्र धंगेकरांनी टू व्हिलरवरुन प्रचार केला. त्यांची काही वर्षांपूर्वी गाडी चोरीला गेली. त्यामुळे सगळ्याच कामासाठी ते टू व्हिलरचा वापर करतात शिवाय टू व्हिलरवरुन लोकांना भेटता येतं. जातायेता नागरिकांच्या समस्या जाणून घेता येता आणि त्या सोडवताही येतात म्हणून ते टू व्हिलर वापरत असल्याचं ते सांगतात.