एक्स्प्लोर

पर्यायी इंधन परिषद शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : पुणे शहर हे नेहमीच नवनवीन बदलांसोबत राहिले असून नवीन क्रांतिकारी कल्पना, ज्ञान, वारसा, नाविन्यता, संस्कृती, चैतन्य ही येथील बलस्थाने आहेत.

Aaditya Thackeray : पुणे शहर हे नेहमीच नवनवीन बदलांसोबत राहिले असून नवीन क्रांतिकारी कल्पना, ज्ञान, वारसा, नाविन्यता, संस्कृती, चैतन्य ही येथील बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यात भरवलेली पर्यायी इंधन परिषद शाश्वत विकासाच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पुण्यात पार पडलेल्या ‘पुणे अर्ल्टरनेट फ्युअल कॉन्क्लेव्ह’ नंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वातावरण पोषक शेती, शहरीकरण, शहरे आणि तेथील वातावरण आणि क्लीन एनर्जी या विषयांवर पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चर्चा सत्र आणि परिषदांचे आयोजन करणार  असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, या परिषदेबरोबरच भरवलेल्या प्रदर्शनामध्ये मोठ्या वाहन उद्योगांनी भाग घेतला; आणि अधिक उल्लेखनीय बाब म्हणजे ३० ते ४० वयोगटातील नवोद्योग (स्टार्टअप) स्थापन करुन वाटचाल करण्यास सुरू केलेल्या युवक-युवतींनीही भाग घेतला. इलेक्ट्रिक वाहने तसेच अन्य पर्यायी इंधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या या युवकांना आपल्या पृथ्वीची जपणूक करण्यासाठी प्रोत्साहन, सहाय्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी सुरू केलेले स्टार्टअप पुढील जवळच्या काळात मोठे नाव कमावतील, असा विश्वासही व्यक्त केला.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून गेल्या दोन वर्षात पर्यावरणाच्या अनुषंगाने चांगली धेयधोरणे बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विभाग सध्या यामध्ये महत्वा ची भूमिका बजावत आहे. देशात प्रथमच महाराष्ट्राने राज्य वातावरण बदल परिषदेची स्थापना करुन त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. नागरी विकास, उद्योग, परिवहन, वने आदी क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी या परिषदेद्वारे बनवल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा निश्चितच उपयोग होईल, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. कोणतेही वाहन खरेदी करताना कमीत कमी इंधनात जास्त अंतर कापणाऱ्या वाहनाला प्राधान्य देण्याची आपली मानसिकता असून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीप्रसंगी यापुढे रेंजला अधिक महत्त्व दिले जाईल. वाहन उद्योगांना या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Embed widget