Pune water Supply :  पुणेकरांसाठी महत्वाची बातमी (Water) आहे. ऐन उन्हाळ्यात पुण्यातील अनेक परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर(Pune) पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ (Water supply)  आली आहे. छावणी पाणीपुरवठा केंद्रांतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने बुधवारी (19 एप्रिल) हडपसर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी (20एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.


या भागात पाणीपुरवठा खंडित केला जाईल


कॅन्टोन्मेंट पाणी पुरवठा केंद्र परिसरः संपूर्ण रामटेकडी औद्योगिक क्षेत्र, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गणगले नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोपूर रोड. डावी बाजू, केशवनगर मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बीटी कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, साडेसातरा नळी, मोहम्मद वाडी रोडची संपूर्ण उजवी बाजू, संपूर्ण हांडेवाडी रोड, संपूर्ण फुरसुंगी आणि उरुळी देवघरची , मंतरवाडी या परिसरात पाठीपुरवठा बंद ठेवल्या जाणार आहे.


पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) राज्याच्या जलसंपदा विभागासोबत मंगळवार, 18 एप्रिल रोजी बैठक बोलावली. ज्यात मंगळवार आणि बुधवार, एप्रिल रोजी शहरातील विविध भागात पाणीकपात सुरू असतानाच पाणी नियोजन आणि कपातीवर चर्चा करण्यात आली आहे. 19, आपत्कालीन दुरुस्तीच्या नावाखाली. पीएमसी आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी सांगितले की, आम्ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत आणि एका योजनेवर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे ज्यामध्ये आम्हाला पाण्याची समस्या कशी सोडवायची याची माहिती मिळेल. पाणीपुरवठा बंद असल्याने काही परिसरातीलल पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. 


ऐन उन्हाळ्यात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद


ऐन उन्हाळ्यात पुणेकरांचा दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरी भागात पुरेसा पाणी पुरवठा आहे मात्र ग्रामीण भागात परिस्थिती काहीशी बिकट आहे. 


 



महत्त्वाच्या बातम्या:


nna Bansode : अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात, थोड्याच वेळात समजेल: अण्णा बनसोडे