Pune Firing crime news : पुण्यात गुन्हेगारीचं (Pune crime news) प्रमाण सातत्याने वाढत आहे.  (Pune Crime News)  त्यातच गोळीबाराच्या (Firing) घटनांमध्ये देखील (Crime news) वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रांवर (Friend) केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघेरी पुण्यातच राहतात. या गोळीबारामुळे खडकवासला (Khadakwasla) परिसरात  काही वेळ खळबळ उडाली होती. 


तेजस प्रकाश गोंधळे, अजिंक्य भानुदास मोडक आणि चेतन मच्छिंद्र मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  तेजस गोंधळे, अजिंक्य मोडक आणि चेतन मोरे हे तिघे सिंहगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते.  तिघांनीही एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर तिघेही खडकवासला धरणाच्या पाण्याजवळ गेले. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. हा सगळा प्रकार वेटरच्या लक्षात आला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पोलिसांत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत तिघेही पोलीस येण्यापूर्वी फरार झाले होते. त्यानंतर गाडीचा नंबर असल्याने तिघांनाही पोलीसांनी पकडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं समोर आलं आहे.


गोळीबाराने पुणे हादरलं...


पुण्यात किरकोळ वादावरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेकजण सर्रास हवेत गोळीबार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यातील वडगावशेरीजवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फ्रॅन्चायजी दिलेल्या आहेत. ते कल्याणी नगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात.  तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.


संबंधित बातमी-


Ajit Pawar : कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज, बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही : अजित पवार