एक्स्प्लोर
पुण्यात विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला
वाडेबोल्हाईमधील जोगेश्वरी माता माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयात आज सकाळी आठव वाजता ही धक्कादायक घटना घडली.
पुणे : पुण्यात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शिक्षक गंभीर जखमी असून त्यांच्यावर वाघोली इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
वाडेबोल्हाईमधील जोगेश्वरी माता माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयात आज सकाळी आठव वाजता ही धक्कादायक घटना घडली. दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे अशी जखमी शिक्षकांची नावं आहेत.
बेशिस्त वागण्याबद्दल तसंच केस कापण्यासाठी दोन्ही शिक्षकांनी आरोपी विद्यार्थ्याला वर्गातच ताकीद दिली होती. हाच राग मनात ठेवून आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर शिक्षक वर्गात जात असताना, विद्यार्थ्याने त्यांच्यावर मागून कोयत्याने हल्ला केला.
हल्ल्यानंतर विद्यार्थी पसार झाला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement