![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pm Modi In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी याबाबतच्या सूचना जाहीर केल्या आहेत.
![Pm Modi In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल pune traffi diversion on karve road due to pm narendra modi visit Pm Modi In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/0a50a27d931662ae4f6fb6d16edcfbcd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pm Modi In Pune : पुणे (Pune) मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी (6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरूड) पर्यंत होणार आहे. त्यामुळे कर्वे रस्ता आणि पौड रस्ता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी याबाबतच्या सूचना जाहीर केल्या आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
तसेच कर्वे रोडवर खंडूजी बाबा चौक (डेक्कन) ते शिवतीर्थनगर (कोथरूड) पर्यंतच्या रस्त्यावर कोणत्याही वाहनाला जाण्यास परवानगी नसणार आहे.
लोक या पर्यायी रस्त्यांचा वापर करू शकतात- कोथरूडकडे जाण्यासाठी, लोक अलका टॉकीज चौक-लाल बहादूर शास्त्री रोड-सेनादत्त चौक किंवा दांडेकर पुलाचा वापर करून डीपी रोड-गुळवणी महाराज रोड-कर्वे रोडवरील करिश्मा सोसायटीपर्यंत पोहोचू शकतात.
तसेच शिवतीर्थनगर ते खंडूजी बाबा चौकाकडे कोणत्याही वाहनाला परवानगी दिली जाणार नाही.
लोक या पर्यायी रस्त्यांचा वापर करू शकतात- शिवतीर्थनगर-मयूर कॉलनी-हुतात्मा चौक-निंबाळकर बाग-डीपी रोड/गुळवणी महाराज रोड-रिव्हरसाइड रोड ते डेक्कन किंवा सेनादत्त चौक लाल बहादूर शास्त्री रोड या पर्यायी रस्त्यांचा वापर लोक करू शकतात. शिवतीर्थ नगर येथून डेक्कन परिसरात येणारी वाहने मयूर कॉलनी येथे वळविण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पत्नीनं पहिलं लग्न लपवलं, त्रासाला कंटाळून पतीनं जीवन संपवलं! दौंडमधील धक्कादायक घटना
- सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे भरती, इच्छुकांसाठी 'ही' माहिती महत्त्वाची
- Pune : दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून चार तरुणांचा मृत्यू, पुण्यातील घटना
- 'माझे फोन आताही टॅप होत आहेत. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न'; संजय राऊतांचा आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)