पुणे : कुठल्याही सरकाराला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते वृत्तपत्र नको असतं. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात मृतदेहांचा फोटो एका वृत्तपत्राने दाखवला, तेव्हा आठ दिवसांत त्या वृत्तपत्रावर धाडी टाकण्यात आल्या. मग त्यावेळी त्याच्या पाठीशी कोणं उभारलं? देशाची मीडिया उद्योजकाच्या हाती जातेय. वृत्तपत्राशिवाय सरकार अन सरकार शिवाय वृत्तपत्र शक्य नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ते पुणे येथे पत्रकार संघाच्या व्याखानमालेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, "कोरोनामध्ये अनेक माध्यमं बंद झाली होती. नंतर ती डिझिटलमध्ये आली. पण त्यामुळे वृत्तपत्रं कमी झाली, मोबाईलवर वृत्तपत्र वाचली गेली. मीडिया आता खूप मोठं झालंय. माझा मीडियाशी संबंध येतो, त्याना रोज माझ्याकडून काही तर हवं असतं. देशात, जगात जे परिवर्तन झालं ते वृत्तपत्रांनी केलं यावर मी ठाम आहे. पण वृत्तपत्रांसमोर आता अनेक आव्हानं आहेत. त्यांना चौथा स्तंभ म्हणता, मग त्यांना संसदेत येणं नाकारल जातंय. आज ते दिसतंय, यावर कोणी आवाज उठवताना दिसत नाहीत. यावर पत्रकारांमध्ये एकजूट हवी.
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, आपण एवढी वर्ष पत्रकारिता केली, आता एवढी माध्यमं आली आहेत, मग वाटतं की एवढ्या दिवस झक मारली. मला लॅपटॉपवर लिहता येत नाही. पण मी लिहतो, आपण लिहायला विसरून गेलो आहे. चिंता वाटते की आपण लिहायला विसरतो आहे. बदललं पाहिजे खर आहे. माझी भाषा मराठी आहे, मला लिहता आलं पाहिजे. या आव्हानाचा मोठा धोका प्रिंट मीडियाला आहे.
माझी परंपरा अभ्यास करुन बोलण्याची नाही, व्याख्यान अभ्यास करून द्यावं लागतं असं खासदार संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :