एक्स्प्लोर

Pune : अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द; गोंगाटामुळे नाटकावर पडदा

Pune : पुण्यात अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच 'संगीत मत्स्यगंधा' या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.

Pune : पुण्यात अभिषेकी बुवांच्या (Abhisheki Bua) स्मृतीदिनीच 'संगीत मत्स्यगंधा' (Sangeet Matsyagandha) या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. शेजारील कार्यक्रमाच्या आवाजाच्या दणदणाटामुळे नाटकावर पडदा पडला आहे. 'डीजे' स्पीकरचा संगीत नाटकाला फटका बसला आहे. आवाजाच्या दणदणाटामुळे 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.

नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर नांदी सादर करून प्रयोग रद्द

अभिषेकी बुवा यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील (Pune) कर्वे रोडवरील 'द बॉक्स' (The Box) नाट्यगृहात 'मस्त्यगंधा' या नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान नाट्यगृहाशेजारी असलेल्या दुसर्‍या सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमातील आवाजाच्या पातळीने मर्यादा ओलांडल्याने कलाकारांना सादरीकरण करणे अशक्य झाले आणि अखेर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर नांदी सादर करून प्रयोग रद्द करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

कलाद्वयी संस्थेतर्फे एरंडवण्यातील 'द बॉक्स' या नाट्यगृहात 'संगीत मत्स्यगंधा' नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. नाट्यगृहाबाहेर 'हाऊसफुल्ल'चा बोर्डही झळकला होता. मात्र नाट्यगृहाशेजारीच असलेल्या 'पुणे स्टुडिओ' येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकांचा आवाज प्रमाणापेक्षा अधिक झाला. 

वारंवार विनंती करूनही 'पुणे स्टुडिओ'मध्ये पार पडत असलेल्या कार्यक्रमाचा आवाज कमी झाला नाही. अखेर 'संगीत मत्स्यगंधा' नाटाकाच्या टीमने  नाट्यगृहाबाहेर येत रसिकांची क्षमा मागत प्रयोग रद्द करत असल्याची घोषणा केली. डीजे आणि लाऊड स्पीकरच्या आवाजाचा त्रास अनेकदा नाट्यकर्मींना आणि प्रेक्षकांना सहन करावा लागतो. आज या गोष्टीचा फटका कलाद्वयी या संस्थेच्या कलाकारांना बसला आहे.

'संगीत मत्यस्यगंधा'च्या टीमकडून सखेद दिलगिरी व्यक्त

नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागल्याने 'संगीत मत्यस्यगंधा'च्या टीमकडून सखेद दिलगिरी व्यक्त करण्यात आली. सखेद दिलगिरी व्यक्त करत त्यांनी म्हटलं आहे,"काल आणि आज संगीत मत्यस्यगंधा'चे प्रयोग 'द बॉक्स'मध्ये आयोजित केले होते. परंतु वारंवार विनंती आणि अर्ज करूनही आपल्या शेजारी कार्यक्रमांची दखल न घेण्याच्या आयोजक आणि संबंधितांच्या धोरणामुळे आवाजाच्या विचित्र पातळीचा त्रास आपल्या या नाटकाला नक्कीच होणार आहे. असमंजस आयोजकांपुढे केवळ नाइलाजाने आजचा आपला प्रयोग रद्द करावा लागत आहे..क्षमस्व". 

कलाद्वयी संस्थेचे संजय गोवासी म्हणाले,"अभिषेकी बुवांच्या स्मृतिदिनी 'संगीत मत्यस्यगंधा' या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागणं हे दुर्दैवी आहे. शेजारील कार्यक्रमांच्या संयोजकांना विनंती करूनही त्यांनी सहकार्य न केल्याने आमचाही नाईलाज झाला. रसिकांना आम्ही त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करणार आहोत".

संबंधित बातम्या

Sasoon Hospital : ससून रुग्णालयासंबंधी म्हैसेकर समितीचा अहवाल सादर; ललित पाटीलला कोण पळवलं? अहवालाबद्दल गोपनीयता कायम

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
Embed widget