पुणे: छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पुण्यातील डेक्कनजवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ मोठी गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा दिमाखदार साजरी व्हावा यासाठी विश्व हिंदू मराठा संघाकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. 


छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा आज सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्त पुण्यात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला एक भव्य आहार अर्पण करण्यात आला. तसेच परिसराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली होती. विश्व हिंदू मराठा संघाकडून या सोहळ्यासाठी पुष्पवृष्टी तसेच भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 


गेल्या काही दिवसांपासून संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणायचं का स्वराज्यरक्षक हा वाद समोर आला असला तरीसुद्धा महाराजांना कुठलीही पदवी द्या, पण इतिहास विसरू नका आणि यात राजकारण करू नका अशी भूमिका यावेळी शिवभक्तांनी मांडली


दुसऱ्या बाजूला, शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजी महाराज पुतळ्याजवळ "स्वराज्यरक्षक" छत्रपती महाराज असे फ्लेक्स उभारण्यात आले होते. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी पुतळ्याला अभिवादन करून घोषणा दिल्या. 


Amol Kolhe on Sambhaji Maharaj: खासदार अमोल कोल्हे म्हणाले... 


खासदार अमोल कोल्हे यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. त्यांनी देखील संभाजी महाराज पुतळ्याला पदस्पर्श करून हार अर्पण केला. यावेळी एक भव्य हार ज्यावर "स्वराज्य रक्षक" असा उल्लेख केला होता, तो अर्पण करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे. त्यांचे विचार मलिन करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र आजचे चित्र सुखावून टाकणारे आहे. स्वराज्यरक्षक ही संकल्पना व्यापक आहे असे खासदार अमोल कोल्हे यावेळी म्हणाले


छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणायचे किंवा स्वराज्यरक्षक हे तुम्ही ठरवा मात्र इतिहास हा विसरून चालता येणार नाही. महराजांचे कार्य आणि बलिदान हे विसरून चालता येणार नाही हेच आजच्या सोहळ्यातून अनेकांनी स्पष्ट केले. 


महत्त्वाची बातमी :