Ajit Pawar Lift Accident: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या लिफ्टला शुक्रवारी अपघात झाला. लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन अचानक खाली कोसळली. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. सुदैवाने बचावलो नाही तर आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या लिफ्टचा शुक्रवारी अपघात झाला, तर पुण्यात (Pune News) काल (रविवारी) एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणतीही इजा झाली नाही. खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली होती. 


बारामतीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लिफ्ट अपघाताचा किस्सा सांगितला. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये लिफ्टमधली लाईट जाऊन चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खालीच गेली. सुदैवानं बचावलोय नाही तर, आजच श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता, असं म्हणत अपघातानंतर दोन दिवसांनी अजित पवार यांनी किस्सा भर कार्यक्रमात सांगितला.


 पाहा व्हिडीओ : Ajit Pawar Lift Accident : लिफ्ट अपघातातून अजित पवार थोडक्यात बचावले ABP Majha



अजित पवार पवार यांनी किस्सा सांगताना म्हटलं की, "मी शुक्रवारी पुण्यात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. त्या हॉस्पिटलमध्येच चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट घेऊन मी आणि डॉ. हर्डिकर निघालो. डॉ. हर्डिकरांचं वय जवळपास 90 वर्ष. ते म्हणाले आता तिसऱ्या मजल्यावर आलात, लिफ्टनं चौथ्या मजल्यावर जाऊयात. आम्ही दोघं आणि आणखी दोन सिक्युरिटी गार्ड लिफ्टमध्ये होते. पण लिफ्ट वरती जाईनाच. नंतर लाईट गेली. अंधारच अंधार आणि लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन धाडदिशी खाली आली. खोटं नाही सांगत, आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता. सुरक्षा रक्षकांनी दरवाजा जोर लावून उघडला. पण मला भिती ती, डॉ. हार्डिकरांची. मी सुनेत्रालाही बोललो नाही, मी आईलाही बोललो नाही आणि मी प्रेसलाही सांगितलं नाही." 


सुप्रीया सुळेंच्या साडीला आग 


रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणताही इजा झाली नाही. सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचं उद्घाटन होतं. याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना बोलवलं होतं. यावेळी दीप प्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग लागली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग, सुदैवाने कुठलीही इजा नाही