Sharad Pawar on Sambhaji Maharaj : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक संबोधल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलन करत भाजपने संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होतेच, पण ते धर्मवीरही होते असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात भूमिका स्पष्ट केली. 


पवार यांनी (Sharad Pawar on Sambhaji Maharaj) छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षक'च असल्याचे सांगितले, ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहताना स्वराज्यरक्षक असल्याचे पुनरुच्चार केला आहे. पुण्यात स्वराज्यरक्षक स्टिकर्सही राष्ट्रवादीकडून वाटली होती. दुसरीकडे भाजपने धर्मवीर स्टिकर्स लावून आंदोलन केले होते. 


शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत कुस्तीला लागलेलं डोपिंगचे ग्रहण, सीमाप्रश्न, राज्यपालांची बेताल वक्तव्ये, शिवसेनेवर होत असलेली टीका, राहुल गांधी, भारत जोडो यात्रा आदी मुद्यावरून त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होईल. त्यावेळी आपली बाजू योग्य पध्दतीने मांडावी अशी मागणी करण्यात आली असून दिल्लीतही  याबाबत बैठक झाली. 


शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात फिरलो आहे, फिरत आहे, कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचेही पवार म्हणाले. कुस्तीमध्ये होत असलेल्या डोपिंगवर ते म्हणाले की, कुस्तीच्या बाबतीत असं झालं असेल याची माहिती नाही. आतापर्यंत असं कधी झालं नाही, पोलिसांनी तपास केला असेल तर त्याची माहिती घेऊ.


सत्ता हातात आली की जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं, पण आता सत्ता आल्यानंतर असं वागत नाहीत. काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला.  राज्यपाल इथं नाखूष असतील, तर आम्ही देखील त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्यावर सातत्याने टीका होते, जनता टीका करते. 


दरम्यान, बिहारमध्ये सुरु असलेल्या जातीय जणगणनेवरून स्वागत केले. जातीआधारीत जनगणनेची मागणी आम्ही देखील अनेक वर्षांपासून केली आहे, लहान लहान घटक आहेत त्यांची मोजमाप व्हावीत. नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. 


राहुल गांधी यांच्या संदर्भात काही पक्षांनी टीका टिंगलटवाळणी केली गेली. राहुल गांधी यांनी एका पक्षापुरते आपला कार्यक्रम ठेवला नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते त्याच्या सोबत सहभागी झाल्याचे दिसून आलं. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 


इतर महत्वाच्या बातम्या