Hukmichand Chordia Passess Away : पुण्यातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. 'सुहाना मसाले- प्रवीण मसालेवाले' (Pravin Masalewale) या सुप्रसिद्ध ब्रँडचे (Masala Brand) ते संस्थापक होते. प्रवीण मसाले या मसाल्याच्या कंपनीची स्थापना त्यांनी केली होती. 1962 मध्ये त्यांनी प्रवीण मसालेवाले या कंपनीची स्थापना केली. आपलं भोजनाचं ताट स्वादिष्ट करणारं अत्यंत विश्वासार्ह नाव म्हणून प्रवीण मसालेवाले या मसाला कंपनीची ओळख आहे.
प्रवीण मसालेवाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी 40-50 वर्ष अविरत कष्ट केले. आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानं उद्योग जगतात शोकाचं वातावरण आहे.
मारवाडी कुटुंबातून आलेल्या चोरडिया यांनी महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या चवीने वेगवेगळे मसाले पुरवले आहेत. चोरडिया हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील. हुकमीचंद चोरडिया यांच्या पत्नी कमलाबाई यांनी मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढं आणली. यातून मोठ्या उद्योगाची स्थापना झाली.
वेगवेगळ्या प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात. याला खास महाराष्ट्रीय तडका असतो. शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात.
प्रवीण मसाले समूहाच्या उत्पादनांची चव महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तर पोहोचली आहेच शिवाय देशाच्या विविध भागात प्रवीणचे मसाले पोहोचले आहेत. या मोठ्या उद्योगाची उभारणी करणारे हुकमीचंद चोरडिया यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या